केळकर महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळकर महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेत यश
केळकर महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेत यश

केळकर महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेत यश

sakal_logo
By

swt1715.jpg
62972
धनराज घाडी
swt1716.jpg
62973
आदित्य कदम

केळकर महाविद्यालयाचे
विभागीय स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात यश मिळविले. ‘तिहेरी उडी’ या क्रीडा प्रकारात धनराज घाडी याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदक पटकावले.
मुंबई विद्यापीठ आयोजित विभागस्तरावरील क्रीडा स्पर्धा मुंबई येथील विद्यापीठ क्रीडांगणावर झाल्या. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला. तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात धनराज घाडी याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदक मिळवले. तर युवराज जोईल याने गोळाफेकमध्ये आणि आदित्य कदम याने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. दोघांनाही रौप्य पदकाची प्राप्ती झाली. रेणुका राणे या विद्यार्थिनीने उंच उडी या क्रीडा प्रकारात तिसरे स्थान प्राप्त करून कांस्यपदक पटकावले. यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे यांच्यासह शिक्षण विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.