कणकवली : मनविसे नियुक्‍त्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : मनविसे नियुक्‍त्‍या
कणकवली : मनविसे नियुक्‍त्‍या

कणकवली : मनविसे नियुक्‍त्‍या

sakal_logo
By

‘मनविसे’चे सिंधुदुर्ग
पदाधिकारी जाहीर
परशुराम उपरकर यांची माहिती
कणकवली, ता. १७ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. याबाबतची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या. नियुक्त्यांमध्ये दक्षिण सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आशिष सुभेदार, दक्षिण सिंधुदुर्ग सचिवपदी संदेश शेट्ये, दोडामार्ग सावंतवाडी तालुका जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ नाईक, वेंगुर्ला- कुडाळ तालुका जिल्हा उपाध्यक्ष महादेव तांडेल, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक मेस्त्री, दोडामार्ग तालुकाध्यक्षपदी प्रतीक देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष गुरु मर्गज, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पवन बागायतदार, सावंतवाडी शहराध्यक्ष आकाश परब, वेंगुर्ला शहराध्यक्ष तेजस मांजरेकर, कुडाळ शहराध्यक्ष गौरव कुडाळकर, दोडामार्ग शहराध्यक्ष नीलेश देसाई, सावंतवाडी शहर सचिव केतन सावंत यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मालवण- देवगड तालुका जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल, कणकवली, वैभववाडी तालुका जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत तर्फे, मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, कणकवली तालुकाध्यक्ष धनराज गोरे, देवगड तालुकाध्यक्ष राकेश मिराशी, वैभववाडी तालुकाध्यक्ष रुपेश वारंग, देवगड शहराध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण झपाटून काम कराल, असे अमित ठाकरे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे. या नियुक्त्या करताना वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मोरे, देवगड तालुका संपर्क अध्यक्ष दिनेश झोरे, कणकवली तालुका संपर्क अध्यक्ष जनार्दन सावंत, मालवण तालुका संपर्क अध्यक्ष दीपक गुराम, कुडाळ तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत, सावंतवाडी तालुका संपर्क अध्यक्ष सचिन पाटणकर यांच्याही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती श्री उपरकर यांनी दिली.