पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी 98 प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी 98 प्रस्ताव
पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी 98 प्रस्ताव

पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी 98 प्रस्ताव

sakal_logo
By

(पान २ साठी)

फोटो ओळी
- rat१७p८.jpg ः
६२९२८
चिपळूण ः बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर येथील शिबिरात नोंदणी करताना पथविक्रेते.

पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसाठी ९८ प्रस्ताव

चिपळुणात नोंदणी शिबिर ; बॅंकेमार्फत मिळणार कर्ज
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १७ ः केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्याचा लाभ शहरातील सर्व पथविक्रेते/फेरीवाले यांना व्हावा या उद्देशाने लाभार्थ्यांसाठी चिपळूण नगर पालिकेतर्फे नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ९८ पथविक्रेत्यांची आपले प्रस्ताव सादर केले.
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर येथे हे शिबिर पार पडले. या शिबिराला पथविक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर ९८ जणांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले. यामध्ये ३७ प्रस्ताव परिपूर्ण असून उर्वरित ६१ जणांचे प्रस्ताव परिपूर्ण करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधितांनी चिपळूण नगर पालिकेतील अश्‍फाक गारदी यांच्याकडे संपर्क साधून आवश्‍यक कागदपत्रे सादर करावयाची आहेत. या योजनेंतर्गत शहरातील सर्व पथविक्रेते/फेरीवाले यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत विनातरण, ७ टक्के व्याज अनुदानाच्या लाभाने प्रथम कर्ज १० हजार रुपये दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिले कर्ज विहित मुदतीत परतफेड केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना २० हजार रुपयांचे दुसरे कर्ज दिले जाणार आहे. त्याचीही परतफेड विहित मुदतीत केल्यानंतर ५० हजार रुपये तिसरे कर्ज देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ शहरातील सर्व पथविक्रेता/फेरीवाले यांना घेता येणार आहे. यामध्ये दैनंदिन विक्री पावतीधारक, नगर पालिका विक्री फेरीवाला प्रमाणपत्रधारक, नगर पालिका/नगर पालिका पथविक्रेता समितीचे शिफारसपत्र धारक यांचा समावेश आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, अश्‍फाक गारदी, बापू साडविलकर, अनिल राजेशिर्के, सचिन शिंदे, राजेंद्र खातू यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.