जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 पदांसाठी भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 पदांसाठी भरती
जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 पदांसाठी भरती

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 पदांसाठी भरती

sakal_logo
By

जिल्हा परिषद वर्ग ३ पदांसाठी भरती
शासनाची मान्यता ः ११५० पैकी ३०० पदे भरणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः जिल्हा परिषदेत रिक्त असलेली शिक्षक, अनुकंपा आणि ग्रामपंचायत कर्मचारी पदे वगळता वर्ग तीनची पदे भरण्यात शासनाने मान्यता दिली आहे. ही भरती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होणार असून एकूण ३०० पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध आस्थापनेअंतर्गत ११५० पदे रिक्त आहेत. २०२० पासून जिल्हा परिषदेत भरती न झाल्याने ही रिक्त पदे वाढली आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आलेला असून एका कर्मचाऱ्याला अनेक आस्थापना संभाळाव्या लागत आहेत. शासनाने राज्यस्तरावर जिल्हा परिषदेत भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. सरळ सेवा भरतीतील एकूण रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत राहून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
२०१९ मध्ये तत्कालीन सरकारने भरती प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार विविध पदांसाठी अर्ज सुद्धा भरण्यात आले होते. त्यानंतर ही प्रक्रिया थांबली. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना असल्याने भरती प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनी जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना शासकीय नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
...............
कोट
"पद भरतीसाठी १ ते ७ फेब्रुवारी कालावधीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून ८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार असून २ ते ५ मार्च या कालावधीत पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ६ मार्च ते ५ एप्रिल कालावधीत परीक्षेच्या आयोजनाबाबत कार्यवाही केली जाणार आहे. ६ ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहेत. १४ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रत्यक्ष परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. १ ते ३१ मे कालावधीत परीक्षा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे, असा संभाव्य भरतीचा कालबध्द कार्यक्रम शासनाने ठरवून दिला आहे."
- राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन