बागायतदारांचे आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागायतदारांचे आंदोलन स्थगित
बागायतदारांचे आंदोलन स्थगित

बागायतदारांचे आंदोलन स्थगित

sakal_logo
By

बागायतदारांचे आंदोलन स्थगित
शामसुंदर रायः आचारसंहितेनंतर २६ डिसेंबरपासून उपोषण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. आचारसंहिता संपताच २६ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांचे संघटक शामसुंदर राय यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने निवेदने दिली जात आहेत. १ मे रोजी उपोषण करण्यात आले. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला; परंतु प्रत्येकवेळी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. महाविकास आघाडी असो किंवा युती सरकार, नेते मंडळींकडून आश्वासने देण्यात आली; पण त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आता ‘आरपार’ची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. १८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते; मात्र सध्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने आंदोलन करू नये, अशी विनंती पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली. त्यांच्या विनंतीचा मान राखून १८ पासूनचे बेमुदत उपोषण आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम आहे. त्यामुळे उपोषण तूर्त स्थगित केले असले तरी आचारसंहिता संपताच २६ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद उपोषण सुरू केल्याची माहिती शेतकरी संघटक राय यांनी दिली.