''कळसुलकर''च्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''कळसुलकर''च्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे
''कळसुलकर''च्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे

''कळसुलकर''च्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे

sakal_logo
By

swt1721.jpg
63021
सावंतवा़डीः गणित कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘कळसुलकर’च्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे
सावंतवाडीत कार्यशाळाः साकोर्डेकर यांचे सुलभ पध्दतीने मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः कळसुलकर हायस्कूलमध्ये ‘वैदिक मॅथ्स वर्कशॉप’चे गोवा-मंगेशी येथील सागर साकोर्डेकर यांचे गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी साकोर्डेकर यांनी तिसरी ते नववीच्या वर्गाला सोप्या पद्धतीने गणित विषय समजून सांगितला.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थी त्यांच्या गणितीय संकल्पना स्पष्ट झाल्याचे दिसले. माध्यमिक शाळेचे गणित शिक्षक एस. व्ही. भुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर यांनी गणिताबद्दलची गोडी निर्माण होण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज व्यक्त केली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांनी गणित विषयाचे महत्त्व सांगून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. प्राथमिक शाळेतील गुंजाळ, बिले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सूत्रसंचालन बिले यांनी, आभार गुंजाळ यांनी मानले. या कार्यशाळेत गणित किती मनोरंजक आहे, मनोरंजनातून गणित कसे शिकावे, गुणाकार वर्ग सोप्या पद्धतीने कसे सोडवावे, याचे अनेक उदाहरणे घेऊन सुलभ क्लुप्त्यांच्या सहाय्याने साकोर्डेकर यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी एज्युकेशनचे संचालक गौरांग चिटणीस यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षिका जे. एस. पावसकर यांनी स्वागत केले. गणितप्रमुख भुरे यांनी कार्यशाळेची कारणमिमांसा केली. उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी एज्युकेशनचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी अशा कार्यशाळांतून पुढे अधिकारी घडून शाळेचा नावलौकिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ शिक्षक एस. एस. वैज यांनी गणितातील अंकांची आकडेमोड व इंग्रजीमधील अक्षरे यांची तुलनात्मक दृष्ट्या माहिती देताना गणित विषय सोपा असल्याचे पटवून दिले. गणित शिक्षिका एस. एस. दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यशाळेचा लाभ प्राथमिक व माध्यमिकच्या एकूण २६० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.