शिरगांव हायस्कूलमध्ये साटम यांचे छायाचित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगांव हायस्कूलमध्ये साटम यांचे छायाचित्र
शिरगांव हायस्कूलमध्ये साटम यांचे छायाचित्र

शिरगांव हायस्कूलमध्ये साटम यांचे छायाचित्र

sakal_logo
By

swt1718.jpg
63018
शिरगांवः येथील हायस्कूलच्या कार्यालयात छायाचित्र लावण्यात आले.

शिरगांव हायस्कूलमध्ये साटम यांचे छायाचित्र
देवगडः तालुक्यातील शिरगांव हायस्कूलच्या कार्यालयात तुकाराम यसोजी तथा बापूसाहेब साटम यांचे छायाचित्र लावण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अरुण कर्ले यांच्या हस्ते कार्यालयात छायाचित्र लावण्यात आले. बापूसाहेबांचे हायस्कूलसाठी मोठे योगदान होते, असे सांगण्यात आले. छायाचित्र लावताना सुगंधा साटम, रवींद्र जोगल, मंगेश लोके, हेमंत देसाई, मुख्याध्यापक शमसुद्दीन आत्तार उपस्थित होते.
................
swt1719.jpg
63019
बांदाः मुलांनी मनोरंजनात्मक खेळ सादर करून बाल दिन साजरा केला.

नाबर स्कूलमध्ये बाल दिन साजरा
बांदाः येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल दिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्त मुलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोलिंग द बॉल, मुलींच्या चित्रास टिकली लावणे, बोंबार्डिंग द सिटीसारखे मनोरंजक खेळ घेण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका देसाई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शिक्षकांनी नृत्य, गाणी सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आले. प्री-प्रायमरी सेक्शनमध्ये देखील बाल दिन उत्साहात साजरा झाला. मुलांसाठी संगीत खुर्ची, पासिंग द बॉल खेळ घेण्यात आले.