चिपळूण-शुक्रवारी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-शुक्रवारी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण
चिपळूण-शुक्रवारी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण

चिपळूण-शुक्रवारी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण

sakal_logo
By

राहुल गांधींच्या सभेचे आज
चिपळुणात स्क्रीनवर थेट प्रक्षेपण
चिपळूण, ता. १७ ः बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शुक्रवारी (ता. १८) काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची विराट सभा होणार आहे. या सभेचे चिपळुणात एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. चिपळूण तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात दुपारी तीन वाजता हे प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.
चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, करामत मिठागरी, कबीर काद्री, सफा गोठे, अन्वर जबले, निर्मला जाधव, श्रद्धा कदम, रवीना गुजर, फैसल पिलपिले यांनी राहुल गांधी यांच्या सभेच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात दाखल झाली आहे. १७ नोव्हेंबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान १८ नोव्हेंबरला दुपारी ३ वा. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात दुपारी ३ वा. हे थेट प्रक्षेपण सुरू होईल.