रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम
रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम

रत्नागिरी- संक्षिप्त ः क्राईम

sakal_logo
By

बॅटऱ्या चोरणाऱ्या
दोघांना पोलिस कोठडी
रत्नागिरी ः शहरातील कीर्तीनगर येथे पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या ८ हजाराच्या दोन बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. जिशान सर्फराज शेख (१९, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) आणि मजीद कासम नाईक (३३, मुळ रा. सौंदळ राजापूर, सध्या रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. १०) रात्री अकरा ते पहाटे पाच या मुदतीत कोकणनगर येथे घडली होती. अजय बाळकृष्ण सक्रे (४२, रा. कामेकरवाडी, ता. संगमेश्‍वर) व दिलीप रूपसिंग राठोड (रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांनी ट्रक (एमएच-०८-डब्ल्यू-८९४९) हा कीर्तीनगर एसटी स्टॉपजवळ पार्क करून ठेवलेला होता. संशयितांनी ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी अजय सक्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोघांनाही अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
--------
बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला
रत्नागिरी ः गेल्या पाच दिवसांपासून बेपत्‍ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह गुरुवारी (ता. १७) दुपारी दीडच्या सुमारास बसणी भोवारीवाडी येथे आढळून आला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंदार मोहन गवाणकर (४५, रा. भोवारीवाडी बसणी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ हर्षद मोहन गवाणकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंदार गवाणकर यांना मद्याचे व्यसन होते. शनिवारी (ता.१२) सायंकाळी साडेचार वाजता मोलमजुरीसाठी बाहेर पडले होते; परंतु त्यानंतर ते घरी न परतल्यामुळे त्यांचा भाऊ हर्षदने मंगळवारी (ता. १५) ग्रामीण पोलिस ठाण्यात ते बेपत्‍ता झाल्याबाबत खबर दिली होती; परंतु, गुरुवारी बसणी येथील स्मशानभूमीजवळील झाडीझुडपात मंदार गवाणकर यांचा मृतदेह आढळून आला.