वक्तृत्व स्पर्धेत कुबल, राजे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धेत कुबल, राजे प्रथम
वक्तृत्व स्पर्धेत कुबल, राजे प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत कुबल, राजे प्रथम

sakal_logo
By

swt1726.jpg
63038
मालवणः रोटरी क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत कुबल, राजे प्रथम
मालवणात आयोजनः तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : येथील रोटरी क्लबतर्फे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन प्रवासावर आधारीत शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पाचवी ते सातवीच्या गटात विधिशा कुबल (दांडी शाळा) हिने, तर आठवी ते दहावी गटात भंडारी हायस्कूलच्या सम्राट राजे याने प्रथम क्रमांक पटकावला.
येथील कन्याशाळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मालवणमधील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून लालबहादूर शास्त्रींचा जीवनप्रवास उलगडला. स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामध्ये द्वितीय-सेजल बिरमोळे (भंडारी हायस्कूल), तृतीय-फरीन मलिक (कन्याशाळा) यांनी मिळविला. आठवी ते दहावी गटामध्ये द्वितीय क्रमांक सिद्धी देऊलकर (रेकोबा हायस्कूल), तृतीय क्रमांक आयुष म्हापणकर, (कुडाळकर हायस्कूल), उत्तेजनार्थ जागृती पारकर (रेकोबा हायस्कुल) यांनी यश मिळविले. परीक्षक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर, सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते झाला. विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, अध्यक्ष रतन पांगे, सेक्रेटरी अभय परब, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, प्रदीप जोशी, नीलम जोशी, भाऊ साळगावकर, सुहास ओरसकर, उमेश सांगोडकर, महेश काळसेकर, रमाकांत वाक्कर, प्रसन्न मयेकर, महादेव पाटकर, रंजन तांबे तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.