चिपळूण-37 लाखाचा अपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-37 लाखाचा अपहार
चिपळूण-37 लाखाचा अपहार

चिपळूण-37 लाखाचा अपहार

sakal_logo
By

चिपळूण अर्बन बँकेत
३७ लाखांचा अपहार
---
संगणक विभागप्रमुखावर गुन्हा; पासवर्डचा गैरवापर
चिपळूण, ता. १७ ः चिपळूण अर्बन बँकेच्या संगणक विभागप्रमुखाविरोधात ३७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मुख्य व्यवस्थापक संतोष देसाई यांनी दिली आहे. हा प्रकार ८ सप्टेंबर २०२० ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला.
काही दिवसांपासून चिपळूण अर्बन बँकेत कर्मचाऱ्याकडून अपहार झाल्याचे उघड झाले होते. बँकेच्या अध्यक्षा राधिका पाथरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत या अपहाराची माहिती देत असताना या प्रकाराची संपूर्ण चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले होते. अपहारावर शिक्कामोर्तब झाले असून, याबाबतची फिर्याद मुख्य व्यवस्थापक देसाई यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार राहुल सुर्वे हा चिपळूण अर्बन बँकेत संगणक विभागप्रमुख म्हणून काम करतो. त्याने पासवर्डचा वापर करून हेतुपुरस्सर ग्राहकांच्या खात्यातील ३७ लाख ७५ हजार ४५ रुपये २० पैसे इतक्या रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानुसार सुर्वेविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे अधिक तपास करीत आहेत.