पान एक-दुभाजकाला धडकून बुलेटस्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-दुभाजकाला धडकून
बुलेटस्वार ठार
पान एक-दुभाजकाला धडकून बुलेटस्वार ठार

पान एक-दुभाजकाला धडकून बुलेटस्वार ठार

sakal_logo
By

६३०७१

दुभाजकाला धडकून
पुण्याचा दुचाकीस्वार ठार
वागदेत अपघात; गोव्याला जात होता स्पर्धेला
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ ः मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोलपंपासमोर झालेल्‍या अपघातात
पुण्यातील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अभिषेक संजय देसाई (वय २२, पुणे हडपसर) असे त्‍याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पुणे स्वारगेट येथील तीस तरुणांचा ग्रुप गोवा येथे जात होता. यात देसाई हा तरुण दुचाकीसह दुभाजकाला धडकला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका कंपनीने गोवा येथे रायडर्स टूर आयोजित केली होती. त्‍या टूरसाठी पुणे स्वारगेट येथून कऱ्हाड मार्गे गोवा असे तीस जण दुचाकीवरून जात होते. दुपारी राजापूर येथे जेवण करून मुंबई-गोवा महामार्गाने हे तरुण गोवा येथे जात होते. सायंकाळी सहाच्या सुमारास यातील अभिषेक देसाई हा दुचाकीवरून जात असताना वागदे पेट्रोलपंपालगतच्या दुभाजकाला त्याच्या दुचाकीची धडक बसली. यात अभिषेक हा थेट महामार्गावर फेकला गेला. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेतली. तसेच वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, दीपक मेस्त्री, होमगार्ड, नीतेश गुरव, सिद्धेश पाटील, महामार्ग पोलिस देवानंद मिठबावकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीवरून कोसळलेल्‍या अभिषेक याला तातडीने कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.