कनेडी येथे ५० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी येथे ५० जणांचे रक्तदान
कनेडी येथे ५० जणांचे रक्तदान

कनेडी येथे ५० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

(फोटोतील रक्तदाता कट करा)
63120
कनेडी ः येथे शिवसेनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात मान्यवर.

कनेडी येथे ५० जणांचे रक्तदान
कनेडी ः शिवसेना नाटळ हरकुळ विभागीय कार्यालय कनेडी येथे शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या नेत्रृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेनेचे नेते अतुल रावराणे, बाळासाहेब भिसे, उपतालुकाप्रमुख राजु रावराणे, युवासेना उपतालुका प्रमुख उत्तम लोके, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, भिरवंडे सरपंच नितिन सावंत, राजू डोंगरे आदी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त हे रक्तादान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी बेनी डिसोजा, आनंद आचरेकर, प्रदिप सावंत, मुकेश सावंत, संतोष सावंत, उमेश गावडे, राजु पाटील, कुणाल सावंत, प्रकाश सावंत, तेजस सावंत, सुदर्शन रासम, योगेश वाळके, सतीश परब, शामसुंदर परब, लक्ष्मीकांत लाड, लवू पवार, अभिषण सावंत, सचिन सावंत, अजय आचरेकर, मुन्ना तेली, विजय सावंत, प्रकाश घाडीगावकर, योगेश सावंत यांचे सहकार्य लाभले. जिल्हा रक्त संकलन विभागाच्यावतीने या शिबिरात डॅाक्टर व परिचारिकांनी सहकार्य केले. त्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.