आंबोली सैनिक स्कूलची उत्तुंग कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली सैनिक स्कूलची उत्तुंग कामगिरी
आंबोली सैनिक स्कूलची उत्तुंग कामगिरी

आंबोली सैनिक स्कूलची उत्तुंग कामगिरी

sakal_logo
By

63145
आंबोली ः सैनिक स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

आंबोली सैनिक स्कूलची उत्तुंग कामगिरी

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा; सर्व वयोगटात विजेतेपद


सावंतवाडी, ता. १८ ः तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीने घवघवीत यश संपादन केले. जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे सैनिक स्कूल आंबोलीच्या क्रीडांगणावर १५ व १६ ला घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल व हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूलच्या संघानी १४, १७, १९ वर्षांखालील वयोगटात विजेतेपद मिळवून जिल्हास्तरासाठी पात्र ठरले.
तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन तालुका किडा समन्वयक नंदकिशोर नाईक यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेत सहभागी खेळाडू, व्यवस्थापक, प्रशिक्षक, किडा शिक्षक उपस्थित होते. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचे मोरे, कळसुलकर हायस्कूल नारायण केसरकर, खेमराज हायस्कूल बांदाचे अण्णा राऊळ, नाबर हायस्कूलचे प्रशांत देसाई, आंबोली पब्लिक स्कूलचे शैलेश सावंत, श्री. पोकळे, सैनिक स्कूलचे मनोज देसाई व सतिश आईर, अधिक्षक रुपेश आईर उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य नितिन गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन हृषिकेश गावडे यांनी केले. फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील अंतिम सामना सैनिक स्कूल, सावंतवाडी संघाचा ४-० अशा गोलफरकाने पराभव केला. महादेव देऊलकर व प्रथमेश बांदिवडेकर यांनी प्रत्येकी २ गोल केले. या सामन्यात सैनिक स्कूलच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहायक क्रिडा अधिकारी मनिषा पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रभारी प्राचार्य नितिन गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचे स्वागत केले. हॉकी स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षाखालील वयोगटात सैनिक स्कूलच्या संघांनी विभागस्तरावर झेप घेतली. पाटील यांनी विभागस्तरीय स्पर्धेसाठी संघाला सुभेच्छा दिल्या. १७ वर्षाखालील फुटबॉल अंतिम सामना सैनिक स्कूल आंबोली विरुध्द व्ही. एन. नाबर हायस्कूल यांच्यात झाला. सैनिक स्कूल संघाने ४-० गोलफरकाने एकतर्फी जिंकला. यामध्ये विघ्नेश सावंत, श्रेयश शिर्के व मंदार गुरव यांनी प्रत्येकी १ गोल केला. यामध्ये १९ वर्षांखालील वयोगटात अंतिम सामना मिलाग्रीज ज्युनिअर कॉलेज विरुद्ध सैनिक ज्युनिअर कॉलेज यांच्यात झाला. हा सामना ३-० अशा गोल फरकाने जिंकत सैनिक स्कूलने विजेतेपद पटकावले. प्रणव पंढरपुरे, दत्तराज नराम, अभिषेक पाटिल यांनी प्रत्येकी १ गोल केला.
--
तेजस पाटील द्वितीय
सातार्डा येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात तेजस पाटीलने दुसरा क्रमांक पटकावला. जिल्हास्तरासाठी बुद्धिबळ संघात त्याची निवड झाली. तालुकास्तरीय विविध क्रिडा प्रकारात विजेतेपद मिळवून सैनिक स्कूलने आपली विजयी परंपरा कायम राखली. सर्व विजयी संघातील खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अध्यक्ष पी. एफ. डान्टस, सेक्रेटरी सुनिल राऊळ, संचालक जॉय डॉन्टस, शिवाजी परब, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ आदींनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.