माजी सभापतींसह ठाकरे शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सभापतींसह ठाकरे शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
माजी सभापतींसह ठाकरे शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

माजी सभापतींसह ठाकरे शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

sakal_logo
By

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१८p५.jpg ः
६३१३०
राजापूर ः पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत गावकर यांच्यासह शेकडो जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रसंगी राहुल पंडित, किरण सामंत, अशफाक हाजू, सौरभ खडपे आदींसह प्रवेशकर्ते.

माजी सभापतींसह ठाकरे शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दणका दिला. पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत गावकर यांच्यासह अणसुरेचे ग्रामपंचायत सदस्य सत्यवान आडिवरेकर, मोरोशी, गोवळ व राजापूर शहर व परिसरातील शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, उद्योजक किरण सामंत व प्रशांत सुर्वे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अशफाक हाजू, माजी नगरसेवक सौरभ खडपे यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पंडित, सामंत हे राजापुरात आले होते. या प्रसंगी त्यांनी राजापुरातील पक्ष संघटना कामाचा आढावा घेतला तसेच विकासकामांबाबत चर्चा केली. यानंतर अशफाक हाजू यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला.
या वेळी रिफायनरी समर्थकांनीही किरण सामंत यांची भेट घेतली. त्यावेळी पंढरीनाथ आंबेरकर, अॅड. यशवंत कावतकर, महेश शिवलकर, राजा काजवे, सुनील भणसारी, डॉ. सुनील राणे, हनिफ मुसा काझी आदी उपस्थित होते. या प्रसंगी गावकर यांनी आपल्या गावातील रस्ता गेली १० वर्षे झाला नाही. केवळ विकासाची पोकळ आश्वासनेच मिळाली. त्यामुळे भविष्यातील विकास डोळ्यासमोर ठेवून आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले.