रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा
रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा

रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा

sakal_logo
By

rat१८p१२.jpg
६३१५१
मुंबईः रत्नागिरी जिल्हा भाजपच्या पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण. सोबत नीलेश राणे, प्रमोद जठार, सचिन वहाळकर आदी.
----------
जिल्हा शतप्रतिशत भाजपमय करा
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी
रत्नागिरी, ता. १८ः जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या आणि नंतर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. या सर्व निवडणूक निकालामध्ये जिल्हा शतप्रतिशत भाजपमय करा. राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे, केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार असल्याने जिल्ह्यामध्येही भाजपची ताकद अधिक वाढवली पाहिजे. भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावीपणे प्रयत्न करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
भाजपच्या मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री चव्हाण यांनी घेतली. बैठकीला माजी खासदार प्रदेश उपाध्यक्ष नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, रत्नागिरी उत्तरचे कार्याध्यक्ष केदार साठे उपस्थित होते. २२८ ग्रामपंचायत निवडणुकांसदर्भातील आढावा व त्याचे नियोजन, संघटनात्मक बाबींसंदर्भात बैठकीत चर्चा झाली.
मंत्री चव्हाण यांनी सांगितले, संघटना म्हणून भाजपची ताकद वाढवा. त्याकरिता प्रत्येक घटकाशी संपर्क अधिक वाढवला पाहिजे. आगामी निवडणुकीत या प्रत्येक घटकांमधील व्यक्तीने भाजपमध्ये सक्रिय होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध समाजाचे कार्यकर्ते कार्यरत आहे, त्यामुळे या समाजातील प्रत्येक कार्यकर्ते भाजपशी कशा पद्धतीने जोडले जातील यासाठी जोरदार प्रयत्न करा. या वेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीला माजी आमदार डॉ. विनय नातू, रामदास राणे, मकरंद म्हादलेकर, अनिकेत कानडे, प्रमोद अधटराव, अभिजित गुरव, सुशांत चवडे, सचिन करमरकर, मुन्ना खामकर, वसंत ताम्हणकर, नीलेश सुर्वे, उल्का विश्वासराव, स्मिता जावकर, ऐश्वर्या जठार, सुरेखा खेराडे, मृणाल शेट्ये, शिल्पा मराठे, परिमल भोसले, चंदुभाई लिंगायत आदी उपस्थित होते.
------------
चौकट
कोकण शिक्षक मतदार संघ महत्त्वाचा
कोकण शिक्षक मतदारसंघाची पहिल्या टप्प्याची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. या संदर्भात दावे व हरकती या २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत स्वीकारल्या जातील. जिल्ह्यातील मतदारनोंदणी सध्या सुरू आहे; परंतु या नोंदणीची संख्या ही मागील निवडणुकीतील मतदार नोंदीच्या तुलनेत कमी असल्यामुळे या नोंदणीमध्ये वाढ करण्याचे आवाहन या वेळी मंत्री चव्हाण यांनी केले.