कामगारांवरील अन्यायाविरोधात मंत्रालयावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांवरील अन्यायाविरोधात मंत्रालयावर मोर्चा
कामगारांवरील अन्यायाविरोधात मंत्रालयावर मोर्चा

कामगारांवरील अन्यायाविरोधात मंत्रालयावर मोर्चा

sakal_logo
By

(टुडे पान २ साठीमेन)

कामगारांवरील अन्यायाविरोधात मंत्रालयावर मोर्चा

भारतीय मजदूर संघाचा इशारा ; चेतना ज्योतीचे रत्नागिरीत स्वागत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १८ ः कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायमस्वरूपी रोजगारावर आलेली गदा, सरकारचा कामगारांकरिता असलेला उदासीन दृष्टिकोन आदी विविध प्रश्नांवर संघटित व असंघटित कामगारांच्या मागण्यांकरिता भारतीय मजदूर संघाने २१ डिसेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांनी जुन्नर येथील सांस्कृतिक भवनातून झालेल्या मजदूर चेतना यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा केली.
शिवनेरी गडावर श्री शिवाईदेवीच्या मंदिरापासून चेतनाज्योतीला सुरवात करण्यात आली. या यात्रेचा भाग म्हणून सातारामध्ये शिरवळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी दौरा करून १३ नोव्हेंबरला कोल्हापूर, रत्नागिरीमध्ये आगमन झाले. या वेळी वीज उद्योगातील कामगार व कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर, प्रश्नांबाबतीत चर्चा करण्यात आली. भीमसंघाने २१ डिसेंबरला मंत्रालयावर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी न्यायहक्कांकरिता कामगारांचा भव्य मोर्चा काढणार असून यामध्ये महाराष्ट्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित विविध विषयांबाबतीत, कामगारांच्या विविध मागण्या सरकारकडे मांडणार आहेत.
या वेळी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल ढुमणे, उमेश महाडिक, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहुल बोडके, अमर लोहार, सागर पवार, उमेश आणेराव, बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष हरी चव्हाण, कामगार महासंघाचे व भारतीय मजदूर संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रवींद्र दामले, संजना वाडकर, अशोक गुरव, रवी चाफेकर, परशुराम नाचणकर आदी उपस्थित होते.

चौकट
प्रमुख मागण्या ः
असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षाकोड त्वरित लागू करून सुरक्षामंडळामार्फत लाभ द्यावा.
कंत्राटी कामगार पद्धत बंद करून त्या रिक्त जागांवर कार्यरत कंत्राटी कामगारांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी.
राजस्थान, ओडिसा, हरियाणा, पंजाब राज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे.
घरेलू कामगार कल्याण मंडळाचे काम व बांधकाम कल्याण मंडळामार्फत सुविधा, लाभ द्यावा.
अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
बीडी उद्योगातील कामगारांना किमान वेतनाची प्रभावीपणे अंमलबजावणी त्वरित करा.
ईपीफ पेन्शन दरमहा पाच हजार रुपये करून महागाई भत्ता देण्यात यावा.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.