जुना शिरोडा नाक्यावर गतिरोधक बसवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना शिरोडा नाक्यावर गतिरोधक बसवा
जुना शिरोडा नाक्यावर गतिरोधक बसवा

जुना शिरोडा नाक्यावर गतिरोधक बसवा

sakal_logo
By

63154
सावंतवाडी ः सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी.

जुना शिरोडा नाक्यावर गतिरोधक बसवा

वाढच्या अपघाताची चिंता; भाजपा युवा मोर्चातर्फे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः शहरातील जुना बाजार शिरोडा नाका येथे गतिरोधक बसवा, अशी मागणी भारतीय युवा मोर्चातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा, सावंतवाडी तालुका मंडळ उपाध्यक्ष राज वरेरकर यांनी उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांना दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, सावंतवाडी जुना शिरोडा नाका येथे तिन तिठे एकत्र असल्याने तिन्ही बाजूंनी येणारी वाहने अति वेगात येतात. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. २०१९ मध्ये याच ठिकाणी दोन मोटर सायकलस्वारांमध्ये समोरासमोर अपघात होऊन एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. नुकताच दोन टू व्हीलरमध्ये अपघात झाला. त्यात निरवडे गावातील दांपत्य दुखापतग्रस्त झाले. या शिरोडा नाक्यावर देशपांडे डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. पंचायत समिती ऑफिस, जिल्हा परिषद बांधकाम ऑफिस, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय आहे. याच रस्त्यावरुन मिलाग्रीस शाळेत जाणारी मुले असतात. हे वर्दळीचे ठिकाण असल्याने लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करुन सदरच्या मार्गावर लवकरात लवकर स्पिड ब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी भारतीय युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन गोवेकर यांनी दिले. यावेळी शिरोडा नाका मित्र मंडळ चौकाचे पदाधिकारी संजय वरेरकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी सुकन्या टोपले, प्रल्हाद केतकर, रोहन नरसुले, समीर कवळेकर, अमेय मडगावकर, नितेश मठकर, हर्षल ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.