सावरकरांवर बोलणे राहुल गांधींनी टाळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकरांवर बोलणे
राहुल गांधींनी टाळावे
सावरकरांवर बोलणे राहुल गांधींनी टाळावे

सावरकरांवर बोलणे राहुल गांधींनी टाळावे

sakal_logo
By

63163
बबन साळगावकर

सावरकरांवर बोलणे
राहुल गांधींनी टाळावे

बबन साळगावकर ः ‘भारत जोडो’चा प्रतिसाद चांगला

सावंतवाडी, ता. १८ ः वीर सावरकरांविषयी आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. मात्र, राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांविषयी जी वक्तव्ये होत आहेत, याबाबत राज्यातील मराठी मनामध्ये चीड निर्माण होत आहे, अशी वक्तव्ये त्यांनी टाळावीत, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
श्री. साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, ''भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या पदयात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. देश विशिष्ट परिस्थितीतून जाताना निर्माण होणाऱ्या सामाजिक दरी विरोधात ते लढा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी आमच्याही मनामध्ये आदर आहे. परंतु, गांधी यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान करणे चुकीचे आहे. वीर सावरकरांविषयी आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. ''ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला'' असे दिव्य गीत ज्यांनी लिहून देशाविषयी असलेली आपली भावना व्यक्त केली, त्या सावरकरांविषयी सातत्याने गांधी यांच्याकडून वक्तव्य होत आहे. याबाबत राज्यातील मराठी मनामध्ये चिढ निर्माण होत आहे, अशी वक्तव्य त्यांनी टाळावीत, असे पत्रकात नमूद केले आहे.