जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हायटेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हायटेक
जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हायटेक

जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हायटेक

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
- ratchl१८१.jpg ः
६३१४२
चिपळूण ः हायटेक झालेले जिल्हा परिषदेचे विश्रामगृह.


जिल्हा परिषदेचे विश्रामगृह हायटेक

चिपळुणातील वास्तूने टाकली कात ; दालनांना किल्ल्यांची नावे
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १८ ः येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची अवस्था तशी नेहमी दयनीय. कधी निधी नसल्याने नादुरुस्त तर कधी निधी आला तर ठेकेदारांची भर, या पद्धतीचे काम. त्यामुळे या विश्रामगृहाकडे स्थानिक वगळता कोणीही फिरत नव्हते; मात्र आता येथील विश्रामगृहाचे रूपडे पालटले आहे. जीर्ण आणि भग्नावस्थेत असलेली ही वास्तू नवा साज घेऊन तयार झाली. येथील दालनांना ऐतिहासिक भैरवगड आणि गोवळकोट किल्ल्यांची नावे देण्यात आली. चिपळुणात नव्याने दाखल झालेल्या जिल्हा परिषद उपअभियंता नीलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामगृहांचा कायापालट झाला.
नूतनीकरणाची कामे झाल्याने जिल्हा परिषदेच्या चिपळूण विश्रामगृहाने कात टाकली. उपअभियंता चौधरी आणि शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांनी कॉर्पोरेटच्या धर्तीवर सूट निर्माण केले. जिल्हा परिषदेचे हे पहिलेच हायटेक विश्रामगृह ठरले. पाच खोल्यांचे हे विश्रामगृह असून दोन सूट हायटेक बनवण्यात आले आहेत. प्रशस्त जागा, उच्च दर्जाचे फर्निचर, एसी, सुंदर असे बाथरूम, असे थ्री स्टार हॉटेलच्या खोल्यांना साजेसे असे दोन सूट तयार केले आहेत. दोन रूमच्यामध्ये डायनिंग हॉल तयार करण्यात आला आहे.
शाखा अभियंता सरदेसाई यांनी एसएलआर योजनेतून निधीची मागणी केली होती. केवळ १२ लाखाचा निधी उपलब्ध झाला. तुटपुंजा निधीतूनही उपअभियंता चौधरी शाखा अभियंता सरदेसाई यांनी ने
नेटके नियोजन केले. खेर्डीतील तरुण ठेकेदार सचिन भोसले आणि रियाज खेरटकर यांच्याकडून काम करून घेतले. ठेकेदारांनी अधिकाऱ्यांची संकल्पना कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्यात उतरवली. त्यामुळेच हे विश्रामगृह आता हायटेक ठरले आहे.
या ठिकाणी अन्य तीन खोल्या आहेत. त्यांनाही वाशिष्ठी, शिवनदी आणि सावित्री अशी नावे दिली. संपूर्ण विश्रामगृहच आलिशान आणि थ्रीस्टार दर्जाचे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उर्वरित कामासाठी ४० लाखाच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये गार्डन, परिसरात डांबरीकरण, लहान मुलांसाठी खेळणी व अन्य दुरुस्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कीर्तीकरण पुजार यांनीही विश्रामगृहाची पाहणी करत बांधकामच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.


पासशिवाय प्रवेश नाही

जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील हे पहिलेच हायटेक विश्रामगृह असून इथे नियमही कठोर ठेवण्यात आले आहेत. कुणीही यावे आणि रूम उघडून बसावे असे चालणार नाही. यासाठी बुकिंग करावे लागणार आहे. शिवाय येथील डायनिंगही भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे पास असेल त्यांना प्रवेश मिळणार आहे. भैरवगड, गोवळकोट, सावित्री, वाशिष्ठी आणि शिवनदी यांचे पावित्र्य जपण्यासाठी येथे कडक नियमावली केली आहे.