-खिचडी शिजवण्याच्या दरात 9.6 टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-खिचडी शिजवण्याच्या दरात 9.6 टक्के वाढ
-खिचडी शिजवण्याच्या दरात 9.6 टक्के वाढ

-खिचडी शिजवण्याच्या दरात 9.6 टक्के वाढ

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

खिचडी शिजवण्याच्या दरात वाढ

शालेय पोषण आहार ; प्राथमिकचे ४८, उच्च प्राथमिकचे ७२ पैसे वाढले

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना खिचडी शिजवण्याच्या दरात प्रति विद्यार्थी दरामध्ये सुमारे ९.६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिकसाठी सुमारे ४८, तर उच्च प्राथमिकसाठी ७२ पैशांची दरवाढ झाली आहे. महागाई आणि विविध वस्तूंच्या दरामध्ये झालेली वाढ पाहता शासनाने पोषण आहाराची प्रति विद्यार्थी केलेली दरवाढ अपुरी ठरण्याची शक्यता आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ होत असताना त्यांची आरोग्य सदृढता व्हावी म्हणून शासनातर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक व २० ग्रॅमयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत शासनाकडून प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम, तर उच्च प्राथमिक वर्गासाठी दिन १५० ग्रॅम तांदूळ पुरवला जातो. या दरामध्ये यावर्षी शासनाकडून सुमारे ९.६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ५ रुपये ४५ पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ८ रुपये १७ पैसे अनुदान मिळणार आहे. ही दरवाढ नुकतीच लागू करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा विचार करताना करण्यात आलेली दरवाढ अपुरी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


असा करता येईल खर्च
ग्रामीण भागात शाळांना तांदूळ व त्यासाठी लागणाऱ्या इतर धान्यमालाचा पुरवठा केला जातो. प्रतिदिनसाठी तरतूद केलेल्या खर्चातून प्राथमिक गटासाठी ३ रुपये ३७ पैसे धान्य आदी माल पुरवण्यासाठी, २ रुपये ८ पैसे इंधन आणि भाजीपाल्यावर खर्च करता येतील, तर उच्च प्राथमिक गटासाठी ५ रुपये ६ पैसे धान्यादी माल पुरवण्यासाठी तर ३ रुपये ११ पैसे इंधन आणि भाजीपालावर खर्च करता येणार आहे. शहरी भागात स्वयंसेवी सेवा, बचतगट यांच्यामार्फत तयार आहाराचा पुरवठा केला जातो. यासाठी केंद्रीय स्वंयपाकगृहाचा वापर होतो. त्यामुळे प्राथमिक गटासाठीचे ५ रुपये ४५ पैसे व उच्च प्राथमिक गटासाठीचे ८ रुपये १७ पैसे आहार तयार करणाऱ्‍या यंत्रणेला देण्यात येणार आहे.