कोकणातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
कोकणातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

कोकणातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

sakal_logo
By

rat१८p११.jpg
६३१४४
मुंबईः कोकण रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना देताना मंत्री रवींद्र चव्हाण.
--------------
रेल्वेस्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण
मंत्री चव्हाण; रत्नागिरी, कणकवलीत सुसज्ज पोलिस ठाणे
रत्नागिरी, ता. १८ः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरू करा. रेल्वेच्या २४ स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले. रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्री चव्हाण यांनी आज कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलिस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभीकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या खड्डेमय रस्त्याबाबत ''सकाळ''ने फोटोफीचर प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मंत्री चव्हाण यांनी काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी असून या प्रमुख रस्त्यांच्या क्राँकिटीकरणासाठी सुमारे १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमार्गावर अपघात, दुर्घटना आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अपघातग्रस्तांना तातडीने उपाययोजना व मदत करण्याच्यादृष्टीने या परिसरात सुसज्ज पोलिस ठाणे व पोलिसचौकीची मागणी सातत्याने रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याबाबत मंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रत्नागिरी व कणकवली येथे दोन स्वतंत्र व सुसज्ज पोलिस ठाणे बनवण्यात यावेत. याच परिसरात ८ पोलिसचौकी नव्याने तयार करण्याबाबात रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने योग्य जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना मंत्री चव्हाण यांनी केली.
बैठकीला कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता नागदत्त राव, वरिष्ठ अभियंता जे. एस. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजभोज, गायकवाड, ओटवणेकर, रमेश, अजयकुमार सर्वगोड, अनामिका जाधव, मध्यरेल्वेचे डीसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगत, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे रत्नागिरीतील सदस्य सचिन वहाळकर आणि सिंधुदुर्गचे विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
पॅसेंजर गाडी दादरपर्यंत
पॅसेंजर गाडी दिवा जंक्शनऐवजी दादर रेल्वेस्थानकापर्यंत करण्याबाबत सावंतवाडी-तुतारी एक्सप्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा देण्याच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. कोरोनाच्या काळात बंद पडलेली नांदगाव रेल्वेस्थानकावरील रो-रो सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.