मालवणात मतदार नोंदणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात मतदार नोंदणी शिबिर
मालवणात मतदार नोंदणी शिबिर

मालवणात मतदार नोंदणी शिबिर

sakal_logo
By

मालवणात मतदार नोंदणी शिबिर
मालवण ः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम २०२३ अंतर्गत ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडे मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. यास्तव यावर्षी विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम २०२३ अंतर्गत १९ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, ३ डिसेंबर, ४ डिसेंबर या चार दिवशी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर चार वेळा विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे या चार दिवशी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणी याबाबतचे विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करणार आहेत, अशी माहिती कुडाळ विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.