खारेपाटण संभाजीनगरात चोरीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण संभाजीनगरात चोरीचा प्रयत्न
खारेपाटण संभाजीनगरात चोरीचा प्रयत्न

खारेपाटण संभाजीनगरात चोरीचा प्रयत्न

sakal_logo
By

63185
खारेपाटण : शहरातील संभाजीनगर-गुरववाडी येथे बंद घर फोडले.


खारेपाटण संभाजीनगरात चोरीचा प्रयत्न

बंद घर फोडून साहित्‍याची नासधूस; दुसऱ्या आठवड्यात पुन्हा चोरीचा प्रकार

खारेपाटण, ता.१८ : शहरातील संभाजीनगर-गुरववाडी येथे आज जयश्री कृष्णा ढेकणे यांच्या मालकीचे बंद घर चोरट्यांनी फोडले. मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच आतील कपाट फोडून सामानाची नासधूस केली. सुदैवाने चोरांच्या हाती काही लागले नाही. मागील आठवड्यातही खारेपाटणमधील दोन बंद घरे चोरट्यांनी लक्ष केली होती.
खारेपाटण संभाजी नगर येथील रहिवासी असलेल्या जयश्री कृष्णा ढेकणे यांचे कुटुंब ब्रह्मपुरी नवीन शिक्षक कॉलनी खारेपाटण येथे राहतात. तर संभाजी नगर खारेपाटण येथील त्यांच्या मालकीचे घर सध्या बंद होते. बंद घर असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्‍यानंतर कपाट तोडून आतील सामान घरभर फेकून दिले. कपाटातील कपडेही बाहेर काढून फेकून दिले. आज सकाळी ही बाब शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आली. त्‍यांनी याबाबत घरमालक यांचे चिरंजीव प्रकाश ढेकणे यांना याबाबत तातडीने माहिती दिली. तसेच खारेपाटण पोलीस स्टेशनला देखील या घरफोडीबाबत कळविण्यात आले.
खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उद्धव साबळे, पराग मोहिते आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. खारेपाटण गावात मागील आठवड्यात संभाजीनगर या भागात बंद घरे फोडण्यात आली होती. त्‍यानंतर पुन्हा असा प्रकार झाल्‍याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.