फोंडाघाट लोरे परिसरात छापा टाकून दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोंडाघाट लोरे परिसरात 
छापा टाकून दारू जप्त
फोंडाघाट लोरे परिसरात छापा टाकून दारू जप्त

फोंडाघाट लोरे परिसरात छापा टाकून दारू जप्त

sakal_logo
By

फोंडाघाट लोरे परिसरात
छापा टाकून दारू जप्त
कणकवली,ता. १८ ः आगामी ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेवून स्थानिक गुन्हा शाखेने बेकायदा दारू व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे. गावा गावात होण्याऱ्या गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर सध्या कारवाई केली जात आहे. तालुक्यातील फोंडाघाट येथील गुन्हा अन्वेषण पथकाने छापा टाकून गोवा बनवटीच्या दारूवर कारवाई केली. ही कारवाई दोन ठिकाणी करण्यात आली असून यात पंधरा हजार तीनशे रुपयाची गोवा बनवण्याची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पंढरी दत्ताराम जावडेकर (वय ४६ रा. लोरे नंबर १) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर बुधवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजता कारवाई करून १४ हजार चारशे रुपयेची दारू जप्त करण्यात आली होती. तसेच फोंडाघाट येथे राहणाऱ्या सुनील राजाराम निकम (वय़३२ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे रात्री आठच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी ९८० रुपयाची दारू जप्त केली आहे.