राज्यशासन कामगार हिताचे निर्णय घेईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यशासन कामगार हिताचे निर्णय घेईल
राज्यशासन कामगार हिताचे निर्णय घेईल

राज्यशासन कामगार हिताचे निर्णय घेईल

sakal_logo
By

(पान २ साठी)

राज्यशासन कामगार हिताचे निर्णय घेईल

पालकमंत्री सामंत ; बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः राज्याचा कारभार लोकशाही मार्गाने केला जात असून कामगारहिताचे निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नासिर कादरी, भरत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस पुष्पराज दहिवले, सुलेमान सिकंदर तडवी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, लोकशाही मार्गाने राज्यशासन कारभार करत असून कामगारहिताचे निर्णय घेतले जातील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर राखत लवकरच महाराष्ट्र राज्यातील इतर विभागातील व वीज कंपनीतील तिन्ही कंपनीतील नोकरभरती आणि पदोन्नतीचा निर्णय शासकीय व प्रशासकीय पातळीवर तातडीने घेतला जाईल. आम्ही लोकहिताला बांधिल आहोत. बाहेर गेलेले प्रकल्पांपेक्षाही महाराष्ट्रात गतिमान प्रकल्प पुढील कार्यकाळात आणण्याचा संकल्प आहे. महापारेषण कंपनीचे संचालक नासिर कादरी म्हणाले, बहुजन पॉवर ही सर्व स्तरातील कामगारांची प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना आहे. कामगार, अधिकारी व अभियंतावर्गाला न्याय देणारी आणि तशी वाटचाल करणारी संघटना आहे.