ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेची चाचपणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेची चाचपणी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेची चाचपणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेची चाचपणी

sakal_logo
By

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१८p१५.jpg ः
६३१६२
राजापूर ः निवडणूक नियोजनाच्या बैठकीला उपस्थित मनसे पदाधिकारी.


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसेची चाचपणी

राजापूर तालुका ; पदाधिकाऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः आगामी काळात तालुक्यात होणाऱ्‍या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदेशाने जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर व जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्‍यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यादृष्टीने संभाव्य उमेदवारी चाचपणी आणि चर्चाही करण्यात आली.
मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे यांच्या उपस्थितीत व राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महिला तालुकाध्यक्ष शर्वरी लिंगायत, जिल्हा सहकार संघटक पुरुषोत्तम खांबल, संजय जड्यार, अजिम जैतापकर, अशोक मोरे, अमिर जड्यार, मंदार राणे, राजा गुरव, पंकज पंगेरकर, प्रदीप कणेरे, अमोल सोगम, विजय गुरव, नितीन पाटणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यामध्ये ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या असून या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गावागावांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्‍यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्यामध्ये संभाव्य उमेदवारी चाचपणीच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. त्याचवेळी निवडणुकीच्या अनुषंगाने अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेचा झेंडा फडकवण्याचा निर्धारही करण्यात आला.