वेंगुर्ले नूतन मुख्याधिकाऱ्यांना ओहोळ बंधाऱ्यांबाबत निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले नूतन मुख्याधिकाऱ्यांना
ओहोळ बंधाऱ्यांबाबत निवेदन
वेंगुर्ले नूतन मुख्याधिकाऱ्यांना ओहोळ बंधाऱ्यांबाबत निवेदन

वेंगुर्ले नूतन मुख्याधिकाऱ्यांना ओहोळ बंधाऱ्यांबाबत निवेदन

sakal_logo
By

63177
वेंगुर्ले ः नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे स्वागत करताना विधाता सावंत. सोबत काँग्रेसचे पदाधिकारी.


वेंगुर्लेच्या मुख्याधिकाऱ्यांना
ओहोळ बंधाऱ्यांबाबत निवेदन
वेंगुर्ले, ता. १८ ः येथील नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने भेट घेऊन शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना येथील मुख्य ओहोळांवर बंधारा घालण्याबाबत निवेदन देण्यात आले.
येतील नगरपरिषद हद्दीतील मुख्य ओहोळातील पाणी कमी झालेले असून त्यातील पाणी अडविण्यासाठी लवकरात लवकर बांध घालणे आवश्यक आहे. जेणेकरून शहरातील विहिरींची पाणी पातळी टिकण्यास मदत होईल, अन्यथा शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नगरपरिषदेमार्फत भटवाडी, महाजनवाडी, साकव पुलाजवळ तसेच सुंदर भाटले अशा ठिकाणी जे पाणी अडविण्यासाठी जे बांध घातले जातात ते लवकरात लवकर घालावे, ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डीचोलकर, माजी नगरसेवक कृतिका कुबल, दादा सोकटे आदी उपस्थित होते.