भरणेत कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरणेत कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे
भरणेत कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे

भरणेत कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे

sakal_logo
By

( पान २ साठी मेन )

फोटो ओळी
-rat१८P२४.JPG-
६३२२०
खेड ः चौपदरीकरणासाठी चिपळूणकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे


भरणेत कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे?

वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ ; वाहतूक कोंडीत वाढ
सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. १८ : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून यू टर्न घेऊन चिपळूणकडे जाणारा रस्ता ठेकेदाराने बंद केल्याने या ठिकाणी वाहन चालकाचा गोंधळ उडताना दिसत आहे. कुठल्या वाहन चालकाने कुठे जायचे हेच कळत नसल्याने या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भरणे नाका येथे कायम होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने येथे आधी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी भरणे नाका येथे ४० ते ५० फुट खोल खड्डा देखील काढण्यात आला होता. खड्डा खोदण्याचे काम सुरु झाल्यावर या ठिकाणी वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता. मात्र वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला जात असल्याने वाहन चालक आणि परिसरातील नागरिक खड्डा खोदल्यामुळे होणारा त्रास निमूटपणे सहन करत होते.
सुमारे वर्षभर हे काम चालल्यानंतर अचानक एक दिवस ठेकेदार कंपनीने खोदलेला खड्डा पुन्हा माती टाकून भरण्यास सुरवात केली. अचानक खड्डा भरण्यास सुरवात झाल्याने सारेच चक्रावून गेले. चौकशी केल्यावर या ठिकाणी भुयारी मार्ग रद्द करून ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. बदललेल्या निर्णयानुसार गेली तीन वर्षे या ठिकाणी ओव्हर ब्रिज बांधण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरु असल्याने येथील वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे. पुलाचे रखडलेले काम आणि होणारी वाहतूक कोंडी याबाबत प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर गेल्या वर्षी उड्डाण पुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली मात्र पुलाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने पुलाच्या एका मार्गिकेतून वाहने हाकणे धोकादायक झाले आहे.


वाहतुकीचा पुरता बोजवारा

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून महामार्गावरील वर्दळीचे ठिकाण असलेल्या भरणे नाका येथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असल्याने महामार्ग चौपदरीकरणाचे काम महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शाप असे म्हणायची वेळ आली आहे.