बालदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालदिन साजरा
बालदिन साजरा

बालदिन साजरा

sakal_logo
By

(पान ५ संक्षिप्त )

फोटो ओळी
-rat१८p२१.jpg ः
६३२०९
खेड ः कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमोल दळवी यांचा सत्कार करताना सतीश चिकणे.

महालक्ष्मी, ''श्रीकृष्ण मंडळ भडगाव'' संघ कबड्डीत प्रथम

खेड ः येथील तालुका कब्बड्डी असोसिएशन व टायटनचा राजा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुका कुमार, कुमारी व किशोर-किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. खेड येथील शिवतर रोड क्रीडांगणावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत किशोर गटात महालक्ष्मी क्रीडा मंडळ चाकाळे यांनी प्रथम तर अनसपुरे संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. कुमार गटात श्रीकृष्ण क्रीडा मंडळ भडगाव संघ विजेता तर उपविजेता भैरवनाथ क्रीडा मंडळ चिंचघर हे संघ ठरले. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश चिकणे, उपाध्यक्ष महेश भोसले, सचिव रवींद्र बैकर, कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, शरद भोसले, दादा बैकर, दिलीप कारेकर यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या टायटनचा राजा कला क्रीडा मंडळाला असोसिएशनच्यावतीने धन्यवाद देत व निवड झालेल्या किशोर, किशोरी व कुमार, कुमारी संघातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.


ज्ञानदीप महाविद्यालयामध्ये मतदार जागृती अभियान

खेड ः ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे-बोरज येथे ''मतदार जागृती अभियान'' झाले. पंचवार्षिक निवडणुकांना समोर ठेवून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यातर्फे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ''मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाला खेडचे निवासी नायब तहसीलदार एल. एम. सिनकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देताना मतदार यादीमध्ये आपले नाव कसे प्रविष्ट करावे तसेच स्वतःचे नाव नोंदवताना भरावा लागणारा नमुना नं. ६ याबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध प्रकारच्या मतदारांसाठी भरावे लागणारे नमुना नं. ७ व ८ याविषयीची महत्वपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये मतदानाचे असणारे महत्व पटवून देताना ज्ञानदीपच्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील गावांमध्ये मतदान व मतदार नोंदणी या अभियानाविषयी जागृती करण्यात येईल, असे आश्वासन प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी निवासी नायब तहसीलदार यांना दिले.


फोटो ओळी
-rat१८p२०.jpg-
६३२०८
प्रा. सतीश साठे.

प्रा. सतीश साठेंना सांगली भूषण पुरस्कार

खेड ः येथील प्रा. सतीश साठे यांना नुकताच ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणेतर्फे दिला जाणारा सांगली भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. साठे यांचे मुळगाव सांगलीतील मंगरूळ चिंचणी येथे आहे. शिक्षकी पेशात काम करताना त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे. ते सध्या खेड येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सुपुत्र असूनही कोकणात त्यांनी ओळख निर्माण केली आहे. पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक भवनात त्यांना २६ नोव्हेंबरला सांगली भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या हस्ते २०२२ ला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील बेळगावे यांनी दिली.

फोटो ओळी
-rat१८p२२.jpg ः
६३२१०
खेड ः शिव येथे बालदिनाचे औचित्य साधून आयोजित वेशभूषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी.

नवजीवन हायस्कूल शिवबुद्रुक येथे वेशभूषा स्पर्धा

खेड ः तालुक्यातील नवजीवन हायस्कूल शिवबुद्रुक येथील प्रशालेमध्ये पं. जवाहरलाल नेहरू जयंती बालदिन साजरा करण्यात आला. या वेळी वेशभूषा स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. पं. नेहरू यांच्या प्रतिमेला नववीमधील सार्थक मोहिते यांनी पुष्पहार अर्पण केला. या स्पर्धेमध्ये २० विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेतला. ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. यामध्ये पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, झाशीची राणी, राणूबाई, येसूबाई, जिजामाता, ताराराणी, भिकाजी कामा, अरुणा असफअली, सावित्रीबाई फुले, शेतकरी यांच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या. लहान गटामध्ये प्रथम करिष्मा कर्जावकर, द्वितीय क्रमांक विभागून अक्षरा शिगवण, नमिषा तांबे, तृतीय क्र. समर्थ कर्जावकर. मोठ्या गटामध्ये अनुक्रमे सिद्धी कर्जावकर, तन्वी तांबे, समृद्धी कासारे यांनी पटकावले.


फोटो ओळी
-rat१८p२३.jpg-
६३२११
खेड ः आयसीएस महाविद्यालयात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य थोरात.

आयसीएस महाविद्यालयात नेहरू जयंती

खेड ः येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालय खेड येथे १४ नोव्हेंबर हा दिवस पं. नेहरू जयंती व बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस आयसीएस महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पं. नेहरू यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. अशा महान व्यक्तींच्या योगदानातून आपला देश स्वतंत्र झाला आणि आज विकासाच्या दिशेने तो वाटचाल करत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.