कोकण रेल्वेचे मुद्रीकरण झाले तर भाडेवाढ निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेचे मुद्रीकरण झाले तर भाडेवाढ निश्‍चित
कोकण रेल्वेचे मुद्रीकरण झाले तर भाडेवाढ निश्‍चित

कोकण रेल्वेचे मुद्रीकरण झाले तर भाडेवाढ निश्‍चित

sakal_logo
By

(पान ५ साठी)

कोकण रेल्वेचे मुद्रीकरण झाले तर भाडेवाढ निश्‍चित

केआरसीयुचा विरोध ; पंतप्रधानांना पत्राद्वारे साकडे
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १८ ः केंद्र सरकारकडून रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्याला मुहूर्त स्वरुप मिळालेले नसले तरीही कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केल्यास कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट आवासून आहे. मालगाडी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेचे मुद्रीकरण करू नये, अशी भूमिका केआरसी एम्प्लॉईज युनिअनने घेतली आहे. यासंदर्भात केआरसीईयुचे अध्यक्ष सुभाष मळगी यांनी पंतप्रधानाना एका पत्राद्वारे साकडे घातले आहे.
कोकण रेल्वेने असंख्य भौगोलिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहेत. सध्या केंद्र सरकारकडून कोकण रेल्वेची परिचालन क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी नवीन दहा स्थानकांची निर्मिती, आठ जादाच्या लुप लाईन, ४७ किलोमीटरचे दुपदरीकरण, ७४० किलोमीटरचे रेल्वे विद्युतीकरण केले जात आहे. यामुळे दिवसाला ६२ रेल्वे गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविल्या जाणार आहेत. ही परिचालन क्षमता १३० टक्केहून अधिक आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केले गेले तर हा प्रकल्प भाड्याने घेणारा चालक प्रवासी भाडे वाढविण्याचे स्वातंत्र्य व निश्‍चित माल वाहतुकीची हमी घेईल. हा प्रकल्प कोकण रेल्वेने अत्यंत कार्यक्षमतेने हाताळलेला आहे. मुद्रीकरणामुळे कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट व मालगाडी भाड्याचा अतिरिक्त भार पडू शकतो. कोकण रेल्वेच्या सर्व साडेपाच हजार कर्मचाऱ्यांचे केआरसीईयु प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे युनिअनने कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच कोंकण रेल्वेचा वापर करणाऱ्या सर्व घटकांपर्यंत होऊ घातलेल्या मुद्रीकरणामुळे होणाऱ्‍या दूरगामी वाईट परिणामांबद्दल माहिती पोचवणे, त्यांना जागरुक करणे व कोकण रेल्वेला अकार्यक्षम प्रकल्पांच्या यादीतून बाहेर काढण्याच्या लढाईला लोकसहभाग मिळविणे, सहाय्य मिळविण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. मळगी यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना कळविले आहे.

कोकण रेल्वे अकार्यक्षम अशी नोंद

केंद्र सरकारने कोकण रेल्वे प्रकल्प अकार्यक्षम असल्याची नोंद केली आहे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरीही तिकिट दर ठरविण्यासह नवीन गाड्या चालविण्याचे अधिकार भारतीय रेल्वेकडे आहे. भारतीय रेल्वे तिकिटामध्ये प्रवाशांना ५३ टक्के सुट देते. कोकण रेल्वेची कार्यक्षमता मोजत असताना याचा विचार केला जात नाही, असे त्या पत्रात नमूद केले आहे.