रत्नागिरी-चिपळूण अर्बनच्या निवडणुकीत येणार रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-चिपळूण अर्बनच्या निवडणुकीत येणार रंगत
रत्नागिरी-चिपळूण अर्बनच्या निवडणुकीत येणार रंगत

रत्नागिरी-चिपळूण अर्बनच्या निवडणुकीत येणार रंगत

sakal_logo
By

चिपळूण अर्बनच्या निवडणुकीत रंगत
तारखांवर सर्व राजकीय पक्षांची नजर
रत्नागिरी, ता. १८ : चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगत येणार आहे. कारण सारे राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरणार आहेत. साऱ्या राजकीय पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी केली असली, तरी निवडणूक होण्यास अजून अवधी असल्याने प्रत्यक्ष रंगत सुरू होण्यास अद्याप काही काळ जाणार आहे. निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. ती कधी होणार याची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. याबाबत निवडणुकीच्या जाहीर झालेल्या तारखा अधिकृत नसल्याची माहिती हाती आली आहे.
चिपळूण अर्बन को- ऑप बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या तपशिलनिहाय प्रसिद्ध झालेल्या तारखांबाबत अधिक माहिती घेता या तारखा जाहीर होण्यास आवश्यक प्रक्रिया अजून झाली नसल्याचे कळते. सहकारी संस्थेची निवडणुक प्रक्रिया ही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्यात येते. प्राधिकरणाचे मंजुरीशिवाय कोणताही निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द करता येत नाही प्राधिकरणाचे मंजूरीनंतरच जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी, संस्था रत्नागिरी या कार्यालयाकडून अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येतो. परंतु सदर बँकेच्या निवडणुक कार्यक्रमाविषयी या कार्यालयाने कोणतीही अधिकृत प्रसिद्धी दिलेली नाही, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी, संस्था रत्नागिरी सोपान शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच प्राधिकरणाने सदर बँकेच्या निवडणूक कार्यक्रम मंजूरी दिल्यानंतर अधिकृतपणे याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी कळवले आहे.