चिपळूण अर्बन बँकेत अपहार करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण अर्बन बँकेत अपहार करणाऱ्यास अटक
चिपळूण अर्बन बँकेत अपहार करणाऱ्यास अटक

चिपळूण अर्बन बँकेत अपहार करणाऱ्यास अटक

sakal_logo
By

चिपळूण अर्बन बँकेत
अपहार, संशयितास अटक
चिपळूणः येथील चिपळूण अर्बन बँकेत ३७ लाख ७५ हजार ४५० रूपयांचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यास पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यास शुकवारी न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता. २२) पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपहारकर्त्यांची बँक खाती देखील सील करण्याची प्रकिया सुरु झाली आहे. राहुल रमेश सुर्वे (३१, मुळगाव-खेर्डी, शिवाजीनगर, सध्या सती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष विजय देसाई यांनी दिली आहे. राहुल सुर्वे हा चिपळूण अर्बन बँकेत संगणक विभाग प्रमुख म्हणून काम असताना त्याने ८ सप्टेंबर २०२० ते १ ऑगस्ट २२ या कालावधीत स्वत: तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून बँकेचे ग्राहक तसेच बँक यांचे पैसे आपली पत्नी, बहीण, वडील व त्यांचे मित्र यांच्या खात्यात वर्ग केले होते. यातूनच त्याने बँकेत ३७ लाख ७५ हजार ४५० रुपयाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यास पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. शुकवारी त्याला न्यायालायत हजर केले असता त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांकडून त्याची खाती देखील सील करण्याची पकिया सुरु केली आहे.