केशवसुत कट्ट्याची दुरुस्ती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवसुत कट्ट्याची दुरुस्ती सुरू
केशवसुत कट्ट्याची दुरुस्ती सुरू

केशवसुत कट्ट्याची दुरुस्ती सुरू

sakal_logo
By

63338
सावंतवाडी ः केशवसुत कट्ट्याच्या नूतनीकरणाचे सुरू असलेले काम.

केशवसुत कट्ट्याची दुरुस्ती सुरू

सावंतवाडीतील ठिकाण; साहित्यिकांच्या मागणीची दखल

सावंतवाडी, ता. १९ ः येथील केशवसुत कट्ट्यावरील तुतारीच्या आजूबाजूच्या परिसराची आणि बैठक व्यवस्था, नवीन टाईल्स व कवितांच्या पाट्या नव्याने बसविणे या कामाची सुरवात कालपासून (ता. १८) करण्यात आली. त्यामुळे काही दिवसांतच या कट्ट्याला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या निधीतून हे काम होत आहे. याबाबत नागरिक, तसेच साहित्यिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात त्यांच्या संकल्पनेतून केशवसुत कट्टा येथे कविवर्य केशवसुतांची स्मारकरुपी तुतारी उभारली होती. काही काळानंतर तुतारी जीर्ण झाल्यामुळे तिच्या नूतनीकरणासाठी केशवसुत कट्ट्यावर बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, तसेच पत्रकारांनी नूतनीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता. माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी याची दखल घेत लोकवर्गणीतून तुतारी उभारण्याचा संकल्प केला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पेडणेकर, रवी जाधव, दत्तप्रसाद गोठसकर, प्रदीप ढोरे आदींसह शहरातील नागरिकांच्या सहकार्याने नव्याने तुतारी उभारली होती. यासाठी आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांच्या माध्यमातून देखील भरीव मदत करण्यात आली होती. नवीन तुतारीचा लोकार्पण सोहळा थाटात झाला होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष साळगावकर, तसेच केशवसुत कट्ट्यावरील ज्येष्ठांच्या मागणीनुसार नूतनीकरणास प्रारंभ झाला असून लवकरच या कट्ट्याला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. या कामाचा प्रारंभ काल करण्यात आला. केशवसुत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिक दत्तप्रसाद गोठोस्कर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, प्रदीप ढोरे, प्रकाश मसुरकर, शामसुंदर भाट, दीपक गडकर, प्रदीप पियोळकर, अरुण मेस्त्री, शंकर प्रभू आदींनी नूतनीकरणासाठी विशेष प्रयत्न केले.