आचरेकर प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरेकर प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य
आचरेकर प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य

आचरेकर प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य

sakal_logo
By

63347
कणकवली : येथील आचरेकर प्रतिष्‍ठानमधील वामन दाजी गायन स्पर्धेचा प्रारंभ करताना नगराध्यक्ष समीर नलावडे. शेजारी पं.समीर दुबळे, वामन पंडित, ॲड.एन.आर. देसाई आदी. (छायाचित्र : अनिकेत उचले)


आचरेकर प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य

नगराध्यक्ष नलावडे; वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धेचे कणकवलीत उद्‍घाटन

कणकवली, ता.१९ : आचरेकर प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांना कणकवली नगरपंचायतीकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्‍तपणे त्रिसुत्री संगीत महोत्सवांतर्गत वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्‌घाटन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
आचरेकर प्रतिष्‍ठानच्या रंगमंचावर झालेल्‍या या कार्यक्रमाला पं.सुधीर पोटे, पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं.समीर दुबळे, आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष अॅड. एन. आर. देसाई, लीना काळसेकर, उमेश वाळके, दामोदर खानलोकर, डॉ. समीर नवरे, मनोज मेस्त्री, धनराज दळवी, मनोज मेस्त्री, सीमा कोरगावकर आदी उपस्थित होते.
श्री. नलावडे म्हणाले, आचरेकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत महोत्सव, नाथ पै एकांकिका, नाट्यमहोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. तर आज वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा होत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील हे उपक्रम गेल्या ४० हून अधिक वर्षे सुरू आहेत. हे कार्य सुरू ठेवताना असंख्य अडचणी व समस्यांचा सामोरे जावे लागत असते; मात्र या सर्व परिस्थितीवर मात करून आचरेकर प्रतिष्ठानने हे उपक्रम सुरू ठेवले आहेत. त्‍यांच्या सर्व उपक्रमांना नगरपंचायतीकडून सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे.
---
गोव्यातीलही स्पर्धक सहभागी
पं. समीर दुबळे म्हणाले, शास्त्रीय गायन स्पर्धेत महाराष्ट्र व गोव्यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा वारसा जिवंत असल्याचे हे चित्र आहे. संगीत ही अशी कला आहे ती शिकण्यापेक्षा आत्मसात करावी लागते. शास्त्रीय संगीताची गोडी असणाऱ्यांनी गायन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गोवा व महाराष्ट्राला लाभलेला शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे न्यावा.
---
नवपिढीने कनेक्ट रहावे
वामन पंडित म्हणाले, सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यासाठी गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ आचरेकर प्रतिष्ठान करीत आहेत. आचरेकर प्रतिष्ठानच्या कामाची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारली आहे. ही बाब कौतुकास्पद असून सांस्कृतिक चळवळीत नव्या पिढीने कनेक्ट व्हायला हवे. शरद सावंत यांनी आभार मानले.