31 ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

31 ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी
31 ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी

31 ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी

sakal_logo
By

rat१९२.txt

( पान ५ )

आघाडी न झाल्यास स्वतंत्र लढण्यास तयार रहा...

३१ ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक ; चिपळूण तालुका ; गणनिहाय मेळाव्याची सुरवात मालदोलीतून

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. १९ ः तालुक्यात सध्या ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या तयारीसाठी १ ते १२ डिसेंबरदरम्यान पंचायत समिती गणनिहाय मेळावे घेण्यात येणार असून त्याची सुरवात खाडीपट्ट्यातील मालदोली गटातून घेण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठरवण्यात आले. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होईल. आघाडी न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची तयारी ठेवण्यात येणार आहे.
शहरातील पाग महिला विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. तालुक्यात सध्या ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. तालुक्यात राष्ट्रवादीची मजबूत ताकद आहे; मात्र वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. काही कारणास्तव आघाडी न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारीदेखील कार्यकर्त्यांनी ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी प्रभावीपणे सभासद नोंदणी कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यात जास्तीत जास्त सभासद नोंदणी होण्यासाठी पंचायत समिती गणनिहाय दौरा करण्याचे ठरले. त्यानुसार तालुक्यातील पहिली बैठक मालदोली गणात घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर १ ते १२ डिसेंबरदरम्यान तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. पक्षाला बळकटी मिळण्यासाठी पंचायत समिती गणनिहाय प्रभावीपणे सभासद नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या चिपळूण अर्बन बॅंकेची निवडणूक होत आहे. या बॅंकेवर शहरातील सभासदांची जास्त वर्णी लागते. ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बँकेच्या संचालक पदावर वर्णी लागण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी आमदार शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम, माजी आमदार रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, महिला तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, दिशा दाभोळकर, रिया कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.