पशुसंवर्धनाच्या योजनांच्या माहितीसाठी एक दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुसंवर्धनाच्या योजनांच्या माहितीसाठी एक दिवस
पशुसंवर्धनाच्या योजनांच्या माहितीसाठी एक दिवस

पशुसंवर्धनाच्या योजनांच्या माहितीसाठी एक दिवस

sakal_logo
By

( पान ५ )

rat१९p३.jpg ः

६३३२०
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथे आयोजित केलेल्या रत्नागिरी पशुसंवर्धन विभाग व पावस पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धनविषयक एक दिवस या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव.

पशुसंवर्धनाच्या योजनांच्या माहितीसाठी एक दिवस

उपसरपंच चव्हाण ;आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून प्रगती शक्य
सकाळ वृत्तसेवा ः
पावस, ता.१९ ः नाखरेसारख्या ग्रामीण भागातील जनतेला पशुसंवर्धनाच्या विविध योजनांची माहिती, उपयोग करून घेता यावा, त्यातून भविष्यात आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून प्रगती करता यावी या प्रमुख उद्देशाने पशुसंवर्धनविषयक एक दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमाने हा उद्देश पूर्ण झाला, असे प्रतिपादन उपसरपंच विजय चव्हाण यानी केले.
रत्नागिरी पशुसंवर्धन विभाग व पावस पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत तज्ञ मार्गदर्शकांद्वारे दुग्ध व्यवसायविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पशुसंवर्धनविषयक एक दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते उपकार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत नाखरे येथे या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळ, सरपंच शुभदा नार्वेकर, विजय चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अभिजित कसालकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे, विवेक पनवेलकर, सुधीर कानसे यांनी लम्पी चर्मरोग प्रसार व रोगप्रतिबंधक उपाय, डोंगरभागातील गाई -म्हशींचे व्यवस्थापन, मान्सूनपूर्व लसीकरण व त्याचे महत्व, कृत्रिम रेतनाचे फायदे, पशुसंवर्धन विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना, कृषी विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना, किसान क्रेडिट कार्ड नाबार्डमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना या विषयी मार्गदर्शन केले.