संस्कृती सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृती सदर
संस्कृती सदर

संस्कृती सदर

sakal_logo
By

rat१९१२.txt

( पान ६ )

संस्कृती...............लोगो

rat१९p२.jpg ः
६३३१९
अंजली बर्वे

इंट्रो

श्रीकृष्णाने विभूती सांगताना सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, असे म्हटले आहे. म्हणजे हा महिना फारच उत्तम, श्रेष्ठ, गुणी असला पाहिजे. अत्रीऋषींच्या मनाप्रमाणे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आले ते याच महिन्यात. समृद्धी देणारी देवी गुरुवारी पुजली जाते ती याच महिन्यात. थोडक्यात सृष्टीचे उत्पत्ती, स्थिती, लय करणारे श्री दत्त महाराज आपल्यासाठी सगुण झाले, त्यांचे कार्य समजून घेतले पाहिजे. माया, संपत्ती हवीच; पण त्याचे आयुष्यातील स्थान किती, त्यामागे धावताना पाळायच्या मर्यादा समजून घ्याव्यात.

- अंजली बर्वे, चिपळूण


संपत्तीमागे धावतानाच्या मर्यादा समजून घ्याव्यात

आज कार्तिकी एकादशी! उत्पत्ती एकादशी! उत्पत्ती, स्थिती, लय यांचे चक्र तर अव्याहत सुरूच आहे. चार महिने महाविष्णूने विश्रांती घेतली आहे आणि प्रबोधिनीच्या दिवशी त्याचे कार्य पुन्हा चालू झाले आहे. माणसानेही त्याला लगेचच कर्मबंधनाची आठवण करून द्यावी, भक्तांकडे पाहावे या हेतूने त्याचे लगेच तुळशीशी लग्न लावले असेल का? सर्व मानवी भावभावनांशी त्याचे नाते जोडले. तो विश्रांती घेत असताना आपण दिवाळी साजरी केली आता त्यालाही तो आनंद द्यावा म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी देवदिवाळी! खरंतर तो नित्य दिवाळी भोगणारा. त्याच्यासाठी दिवाळी कोणती? तर भक्तांनी सन्मार्गाने जावे हीच दिवाळी. म्हणून संसारातील माया, मोहपाशाचे अज्ञान तिमिर नाहीसा करावा आणि सुखसमाधानाचे दीप उजळले पाहिजेत.
मार्गशीर्ष हा महिना सर्वार्थाने उत्तम. या महिन्यात धनधान्य घरात आलेले असते. हवेत सुखद गारवा असतो. अन्न अपचनाचा फारसा प्रश्न नसतो. म्हणूनच या दिवसात तळणीचे पदार्थ, घारगे, वडे, आंबोळी, बाजरीची भाकरी असे विविध पदार्थ केले जात असावेत. खंडोबा दैवताचे पूजनअर्चन केले जाते, नवरात्र साजरे होते. खासकरून कोकणात ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे. पोळा सणाप्रमाणेच देवदिवाळीदिवशी गाईबैलांच्या पुढ्यात खाण्यात आंबोळी घातली जाते.
जाकाई, जुकाई, निनादेवी, कालभैरव, जोगेश्वरी अशा विविध गावातील देवदेवतांच्या जत्रा याच दिवशी भरतात. गाव सोडून पोटापाण्यासाठी गेलेले चाकरमानी या दिवशी मात्र हमखास येतात, देवीची ओटी भरतात, मनोभावे पाया पडतात. आपल्यामागे तीच उभी आहे, आपले रक्षण ग्रामदेवच करतो, हा ठाम विश्वास असतो त्यांचा. या जत्रेमुळे किमान तीन पिढीचे वंशज एकत्र येतात. सगेसोयरे भेटतात. गावातील वातावरण बदलते. उत्साह, चैतन्य दुणावते. खेडेगाव आणि शहरी भागातील फायदे-तोटे, ताणतणाव, नवे विचार, नवे शोध यावर चावडी, चौकात चर्चा रंगतात. विचारांची देवाणघेवाण होतेच; पण त्याचबरोबर एकमेकांना समजून घेता येते, जवळीक वाढते. प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला देवत्वाचा अंश जरी जाणवला तरी तीच खरी देवदिवाळी. देवदेवतांच्या जन्माचे रहस्य, कारण आणि त्या कथांचा लावायचा अर्थ यांची जीवनाशी सांगड घालता यायला हवी. ग्रामदेवता, कूलदेवता, आराध्य दैवत यांचे कार्यक्षेत्र आपल्याला समजते तसेच आपले कार्यक्षेत्र आपल्याला ठरवता यायला हवे. त्यांच्यापुढे नतमस्तक होणे हे केवळ भीतीपोटी नसावे. नियती शरणागतीसुद्धा नकोच तर इथे हवा विश्वास, श्रद्धा, परंपरांचा अभिमान आणि त्याचबरोबर नम्रता.
आपण जे काही घडत जातो ते या समाजरचनेमुळे. सुरक्षित, संरक्षित असल्यामुळे, सीमेवर प्राणपणाने अशुभ निवारण करणाऱ्या सैनिकांमुळे, गाई, बैल, निसर्ग यांच्या साहाय्याने. ही चराचर सृष्टी एकमेकांना साहाय्य करणारी आहे. तिची म्हणून एक व्यवस्थित घडी आहे. ती घडी बिघडते ती आपल्या अविचाराने, स्वार्थाने, तात्पुरत्या सुखाच्या कल्पनांनी. या अज्ञान तिमिराला जाळून सृष्टीभान जपूया, दीप उजळू तरच देवदेवतांना दिवाळी साजरी झाल्याचा आनंद मिळेल.