निवडणूक प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक प्रक्रिया सुरू
निवडणूक प्रक्रिया सुरू

निवडणूक प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

63332
सावंतवाडी ः इंदिरा गांधी यांना अभिवादन करताना काँग्रेस पदाधिकारी.

सावंतवाडीत काँग्रेसतर्फे
इंदिरा गांधींना अभिवादन
सावंतवाडी,ता.१९ ः तालुका काँग्रेसतर्फे आज इंदिरा गांधी यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ॲड. दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, रवींद्र म्हापसेकर, आनंद कुंभार, संतोष सावंत, अरुण नाईक, संजय लाड, मनोहर वेंगुर्लेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, बाप्पा नाटेकर, चंद्रकांत राणे आदी उपस्थित होते.
---
निवडणूक प्रक्रिया सुरू
कणकवली ः ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांकडून या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून त्यासाठी तहसीलदार कार्यालयातच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
--
तिरोडा माऊली जत्रोत्सव २८ ला
शिरोडा ः तिरोड्याचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा जत्रोत्सव सोमवार (ता.२८) होणार आहे. या निमित्ताने केळी ठेवणे, ओटी भरणे, समराधना, पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर आजगावकर दशावतार कंपनीचे नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.