संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat१९२३.txt

( पान ५ )

फोटो rat१९p१३.jpg ः
६३३६७
खेड ः थाळीफेकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा सौरभ बांद्रे शिक्षकांसमवेत.

आयसीएस महाविद्यालयाला थाळीफेकमध्ये सुवर्ण

खेड ः मुंबई विद्यापीठांतर्गत कोकण विभागाच्या झालेल्या अॅथलॅटिक्स स्पर्धेत सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस महाविद्यालयाने विविध क्रीडाप्रकारात सहभाग घेतला होता. त्यात सौरभ बांद्रे याने सुवर्ण कामगिरी करत थाळीफेक या प्रकारात २८.८ मीटर थाळीफेक केली. कोकण विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत एकूण १६ महाविद्यालयांनी भाग घेतला होता. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला यासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागप्रमुख डॉ. बी. जी. यादव यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. एस. के. घुमरे, प्रा.स्नेहा जैन यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सहजीवन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, नंदकुमार गुजराथी, मंगेशभाई बुटाला, अ‍ॅड. आनंदराव भोसले, डॉ. एच. पी. थोरात, क्रीडा विभागातील सर्व सदस्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

सुकिवली शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन

खेड ः तालुक्यातील सुकिवली प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. श्रावणी शिंदे, खुशी चव्हाण, अक्षता निकम, पूजा शिंदे, सांची चव्हाण, रोशनी पवार, सान्वी नलावडे, मानसी पवार, पूजा पवार या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले. अ‍ॅड. दिलीप चव्हाण, मुख्याध्यापक अशोक मगदूम यांच्या हस्ते मौलाना कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अ‍ॅड. चव्हाण यांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन करून मनन करण्याचा सल्ला दिला.

तायक्वांदा स्पोर्ट्स फाउंडेशनला सुवर्णपदके

दाभोळ ः तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा ए. जी. हायस्कूल दापोली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे आयोजन तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी दापोली यांनी केले होते. या स्पर्धेत तायक्वांदा स्पोर्ट्स फाउंडेशन दापोली संस्थेचे खेळाडू शाल्मली माने, मृणाली तांबे, स्वराली दळवी, ऋतुराज ईदाते, वेदांत ईदाते या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले तर सार्थक साखळकर व युवराज शिगवण यांनी कांस्यपदक मिळवले. दिव्यांशू माने याने सहभाग घेतला. सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. या खेळाडूंनी तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी ऑफ दापोलीचे नावलौकिक वाढले आहे. तायक्वांदो स्पोर्ट्स फाऊंडेशन दापोली संस्थेच्या प्रमुख प्रशिक्षक तसेच सचिव प्राजक्ता माने (ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच) यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन वरिष्ठ खेळाडू शिल्पा साखळकर व शालिनी भुवड यांनी सहप्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. या वेळी दापोली तालुक्यातील शाळांमधील क्रीडाशिक्षक, पालक, विद्यार्थी व अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले.

पालगड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
दाभोळ ः रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून दापोली तालुक्यातील पालगड ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशनअंतर्गत पालगड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे व माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नेहा जाधव, युवराज जाधव, प्रियांका शिंदे, अनिल बेलोसे, गजानन दळवी, रसिका जाधव, समिधा काते, प्रियांका दिघे सर्व पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.