राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारीची दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारीची दखल
राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारीची दखल

राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारीची दखल

sakal_logo
By

rat१९२५.txt

( पान ३ )

rat१९p१६.jpg ः
६३३८८

राजापूर ः ग्रामस्थांशी चर्चा करताना आमदार राजन साळवी. या वेळी उपस्थित डॉ. संघमित्रा फुले, प्रशांत भोसले आदी.


राजापूर ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारीची दखल

आमदार साळवी ; रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावणार


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः शहरातील ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्‍या आरोग्य सेवासुविधांमुळे रुग्णांची होणारी परवड आणि मिळणाऱ्‍या आरोग्यविषयक सुविधांबाबत आमदार राजन साळवी यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालयात बैठक घेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या वेळी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी रुग्णालयातील रिक्त पदे व रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही या वेळी दिली.
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, अपुरा औषधसाठा व एक्स-रे, सोऩेग्राफीसह अन्य सुविधा नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे तर कधी कधी रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी वा अन्य ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने काही रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत तर गर्भवती महिलांचीही मोठी गैरसोय होत आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयावर धडक देत जाब विचारला होता.
यावर आमदार साळवी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह राजापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या वेळी उपस्थित नागरिकांनी रुग्णालयातील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी केली तसेच नादुरुस्त रुग्णवाहिका व रुग्णवाहिका चालकांच्या कमतरतेमुळे रुग्णांना अधिक उपचाराकरिता हलवताना येणाऱ्‍या अचणींची माहिती दिली. या वेळी आमदार साळवी यांनी पदभरतीबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील, असे सांगितले तर रुग्णवाहिकेचाही प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला चव्हाण, नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कामले, राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, दुर्वा तावडे, हनिफ मुसा काझी, राजू रानडे, दिनानाथ कोळवणकर, सुशांत मराठे, संजय पवार, संतोष हातणकर, विनय गुरव, शंकर सोलगावकर, राजेश खानविलकर, संदेश आंबेकर, संदेश मिठारी आदींसह नागरिक उपस्थित होते.