सांडेलावगण येथे हातभट्टीची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांडेलावगण येथे हातभट्टीची दारू जप्त
सांडेलावगण येथे हातभट्टीची दारू जप्त

सांडेलावगण येथे हातभट्टीची दारू जप्त

sakal_logo
By

सांडेलावगण येथे हातभट्टीची दारू जप्त
रत्नागिरीः सांडेलावगण-तेलीवाडी येथील जगंलमय भागात झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ९३० रुपयांची १८ लिटर दारू जप्त केली आहे. जयगड पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र सखाराम रहाटे (वय ६२, रा. सांडेलावगण-तेलीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांडेलावगण येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रहाटे यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९३० रुपयांची १८ लिटर विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडले.
--------
तरवळ येथे दारू अड्ड्यावर धाड
रत्नागिरीः तरवळ-धनगरवाडी येथे ५६० रुपयांची विनापरवाना हातभट्टीची दारू विक्रीवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये १२ लिटर दारू जप्त केली असून, ग्रामीण पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष तुकाराम आखाडे (वय ४०, रा. कुरबी धनगरवाडी- तरवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित आखाडे यांच्याकडे ५६० रुपयांची १२ लिटरची विनापरवाना हातभट्टीची दारू सापडली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर जोशी यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
---------
जुने भाजीमार्केट येथे जुगारावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील जुने भाजीमार्केट बिल्डींगच्या पाठीमागे एका बंद टपरीच्या बाजूला आडोशाला मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये साहित्यासह १ हजार २६९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनोज सहदेव भाटकर (वय ५७, रा. भाट्ये, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जुने भाजीमार्केट येथे निदर्शनास आली.
..........
बाथरूममध्ये पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरीः शहरातील टीआरपी येथे बाथरूममध्ये पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. अंकुश रमाकांत शिंदे (वय ५३, रा. समर्थ सदन अपार्टमेंट, टीआरपी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.
.........
साकुर्डे येथून वृद्ध बेपत्ता
दाभोळः साकुर्डे-जगदाळेवाडी येथून शौचाला गेलेला वृद्ध परतला नाही. दापोली पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. शांताराम जगदाळे (वय ७५) असे बेपत्ता वृद्धाचे नाव आहे. ही घटना १ नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जगदाळे हे संध्याकाळी शौचाला जातो, असे सांगून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरीही घरी परतले नाहीत म्हणून आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचा शोध घेण्यात आला. ते कोठेही आढळून आले नाहीत. याबाबत वसंत जगदाळे यांनी दापोली पोलिसात खबर दिली.