कथाकथन स्पर्धेत प्रज्ञा, श्रुतिका प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथाकथन स्पर्धेत प्रज्ञा, श्रुतिका प्रथम
कथाकथन स्पर्धेत प्रज्ञा, श्रुतिका प्रथम

कथाकथन स्पर्धेत प्रज्ञा, श्रुतिका प्रथम

sakal_logo
By

63455
बांदा ः नट वाचनालयात आयोजित कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर.

कथाकथन स्पर्धेत प्रज्ञा, श्रुतिका प्रथम

बांद्यात उपक्रम ः नट वाचनालयाकडून विजेत्यांचा गौरव


बांदा, ता. १९ ः शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी येथील नट वाचनालयाच्यावतीने विष्णू गावकर (आडाळी) पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात प्रज्ञा मोर्ये (खेमराज हायस्कूल, बांदा) हिने, तर लहान गटात श्रुतिका राजगोळकर (जिल्हा परिषद शाळा इन्सुली नं. १) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तिसरी ते चौथी गटासाठी ‘साने गुरुजींची कथा’ हा विषय होता. या गटात नील बांदेकर (केंद्रशाळा बांदा नं. १), पार्थ सावंत (सुधाताई कामत शाळा नं. २ सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्वरा गवस (मळगाव-कुंभार्ली शाळा), चैतन्य महाबळ (व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम, बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. पाचवी ते सातवी गटासाठी ‘थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग’ असा विषय होता. या गटात चिन्मय कोटणीस (सावंतवाडी शाळा नं. २), अस्मी मांजरेकर (आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पूर्वा मोर्ये (केंद्रशाळा बांदा नं. १), नैतिक मोरजकर (केंद्रशाळा बांदा नं. १) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका गौरवी पेडणेकर, चंद्रकांत सावंत यांनी केले. (कै.) विजयालक्ष्मी गावकर, (कै.) बिपीन गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, विशाखा गावकर, पराग गावकर, सेवानिवृत्त प्रा. प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, संचालक नीलेश मोरजकर, जगन्नाथ सातोसकर आदी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नाडकर्णी, प्रवीण मांजरेकर, शिक्षक जे. डी. पाटील, स्वाती पाटील, रीना मोरजकर, सुधाकर डेगवेकर, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.