नऊ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊ लाखांचा गंडा
नऊ लाखांचा गंडा

नऊ लाखांचा गंडा

sakal_logo
By

rat196 .tx
( पान 3 )

आठ लाखांच्या कर्जाच्या अमिषाने
बँक कर्मचाऱ्याला नऊ लाखांचा गंडा

स्वतंत्र पथकाद्वारे भामट्याचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा ः

रत्नागिरी ता. १९ ः आठ लाख रूपये कर्ज मंजूर करून देतो असे अमिष दाखवत बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच नऊ लाख रूपयांहून अधिकचा गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात भामट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. राजेश नडीमट (रा. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा स्वतंत्र पथकाद्वारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की शहर परिसरातील एका बँकेत एक तरूण नोकरी करतो. त्याला कर्जाची गरज होती. संशयित राजेश नडीमट त्याच्या संपर्कात आला. त्याने तरुणाला पुण्यातील एका बँकेतून आठ लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे अमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्याच्या सांगण्याप्रमाणे संबधित तरूणाने त्याच्या बँकखात्यावर टप्याटप्याने नऊ लाख २६ हजार रूपये जमा केले. इतके पैसे देऊनही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे आपली फसगत होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने शहर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. हा प्रकार 22 मार्च ते सप्टेंबर 2022 या मुदतीत घडल्याचे त्याने फिर्यादेत म्हटले आहे. पोलिसांनी राजेश नडीमटला या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.


चौकट...
ऑनलाइन कर्ज घेताना जपून..

फसवणूक झालेला तरूण स्वतः बॅंकेत काम करतो. तरी देखील ही फसवणूक झाल्याने सर्वच अवाक् झाले आहेत. याआधी त्या तरूणाने साडेचार लाखाचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यामुळे संशयितावर त्यांचा विश्वास बसला होता. लवकरच संशयित जाळ्यात येईल, असा विश्वास पोलिस उपनिरीक्षक साळुखे यांनी वर्तवला आहे; पण लोकांनी कर्ज घेताना अशी चुक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
-----------------------------------