वरवडेत २७ ला आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवडेत २७ ला आरोग्य शिबिर
वरवडेत २७ ला आरोग्य शिबिर

वरवडेत २७ ला आरोग्य शिबिर

sakal_logo
By

वरवडेत २७ ला आरोग्य शिबिर
कणकवली ः सोनू सावंत मित्रमंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून २७ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिराच्या आयोजन केले आहे. आयडिल इंग्लिश स्कूल वरवडे येथे हे शिबिर होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून यावेळी इसीजी तपासणी केली जाईल. शिबिरांमध्ये डॉ. सूर्यकांत तायशेट्ये,डॉ. बी.जी. शेळके, डॉ. राज मेमन हे हृदय विकाराबाबत तपासणी करणार आहेत. डॉ. विद्याधर तायशेट्ये सर्जरीबाबत माहिती देणार आहेत. डॉ. निलेश पाकळे आणि डॉ. शरद चव्हाण हे हाडाच्या दुखीबाबत तपासणी करतील. महिलांच्या आजारावर डॉ. ए. आर. नागवेकर, डॉ. अश्विनी नवरे, डॉ. विशाखा पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत मोघे, नितीन शेट्ये, डॉ.आदित्य शेळके तपासणी करतील. नेत्र तपासणीसाठी डॉ. प्रसाद गुरव आणि डॉ. राकेश बोरकर हे सहभाग घेणार आहेत. कान,घसा याविषयीची तपासणी डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. प्रीती नायगावकर, डॉ. ओंकार वेदक आणि दंत तपासणीसाठी डॉ. स्वप्नील राणे, डॉ.र्धेर्यशिल राणे सहभागी घेऊन तपासणी करणार आहेत.
----
‘मराठा समाज’तर्फे आवाहन
कुडाळ ः सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेमार्फत दरवर्षी स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो. यावर्षी संस्थेतर्फे २८ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन केले आहे. त्यासाठी २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा ज्ञातीबांधवातील पदवीधर उच्चश्रेणी तसेच पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच दहावीमध्ये ८० टक्केपेक्षा अधिक गुण, बारावी मध्ये ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रके २५ डिसेंबरपर्यंत मराठा समाज सभागृह, कुडाळ हायस्कूल शेजारी व (कै.) टी. व्ही. देसाई विद्यार्थी वसतिगृह सालईवाडा, सावंतवाडी येथे सकाळी १० ते २ या वेळेत द्यावीत, असे आवाहन चिटणीस नंदू गावडे यांनी केले आहे.
---
दारू विक्रीप्रकरणी महिलेवर कारवाई
सावंतवाडी ः आंबोली-बाजारवाडी येथे एका महिलेवर दारू विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. फुला वॉलतीन डिसोजा असे तिचे नाव आहे. तिच्याकडून २ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला. संबंधित महिला बाजारपेठेत हातात पिशवी घेऊन उभी होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. तिची कसून चौकशी केली असता पिशवीमध्ये दारू आढळली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमित गोते, दत्ता देसाई, राजेश नाईक यांनी केली.
--
खारेपाटण येथे दारू जप्त
कणकवली ः खारेपाटण कोष्टीआळी येथे बेकायदा दारू बाळगल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. प्रदीप विश्वनाथ निग्रे ( वय ५७ ,रा. खारेपाटण), असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल पराग मोहिते यांनी ही कारवाई केली. संशयिताच्या घराच्या पाठीमागे शनिवारी (ता.१९) झालेल्या कारवाईत ४ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.