राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत तळेरे शाळेस १७ सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत 
तळेरे शाळेस १७ सुवर्ण
राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत तळेरे शाळेस १७ सुवर्ण

राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत तळेरे शाळेस १७ सुवर्ण

sakal_logo
By

63536
तळेरे ः चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक. (छायाचित्र : एन. पावसकर)

राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत
तळेरे शाळेस १७ सुवर्ण
तळेरे ः रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध चित्रकला स्पर्धेत कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी १७ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्यपदके पटकावली. अर्णव सुर्वे हा विद्यार्थी तब्बल ३ सुवर्णपदकांचा मानकरी ठरला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्षा सिद्धी साटम, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी सदस्य शशांक तळेकर, सर्व सदस्य यांनी अभिनंदन करून कौतुक केले. या विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक सत्यवान चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
---
हापा-मडगाव रेल्वे विजेवर
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गाचे आता विद्युतीकरण झाल्यानंतर अनेक रेल्वेगाड्या विजेवर धावू लागल्या आहेत. हापा-मडगाव (२२९०८) व मडगाव-हापा (२२९०७) ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीही यापुढे विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. हापा-मडगाव २३ पासून, तर मडगाव-हापा २५ पासून विजेवर धावणार आहे.
--------------
फांदी पडल्याने वेंगुर्ले-मठ मार्ग ठप्प
वेंगुर्ले ः वेंगुर्ले-मठ मार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गावर आडेली-खुटवळवाडी येथे १८ ला रात्री ८.३० वाजता वडाची मोठी फांदी अचानक तुटून पडल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने फांदी हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या मार्गाच्या रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्या वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. याबाबत संबंधित विभागाने वेळीच लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
--
रेडी येथे आज धार्मिक कार्यक्रम
रेडी ः रेडी येथील श्री देव सिद्धेश्वराचा वाढदिवस उद्या (ता. २१) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
नानेलीत उद्या वार्षिक जत्रोत्सव
कुडाळ ः नानेली गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (ता. २२) होणार आहे. त्यानिमित्त केळी ठेवणे, ओटी भरणे, पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर रात्री कलेश्वर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.