पावस-गोळपमधील नदीवर बंधाऱ्यांची साखळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-गोळपमधील नदीवर बंधाऱ्यांची साखळी
पावस-गोळपमधील नदीवर बंधाऱ्यांची साखळी

पावस-गोळपमधील नदीवर बंधाऱ्यांची साखळी

sakal_logo
By

rat२०p८.jpg-
६३५४६
गोळपः श्रमदानातून गोळपमधील नदीवर बांधलेला कच्चा बंधारा.
----------

गोळपमधील नदीवर बंधाऱ्यांची साखळी
जनसेवा सामाजिक मंडळाचा उपक्रम ; लोकसहभागातून श्रमदान
पावस, ता. २० : गोळप-नवेदरवाडीत लोकसहभागातून श्रमदान करून नदीवर कच्चा बंधारा बांधण्यात आला. सकाळी ६ ते ८ यावेळेत ग्रामस्थांनी श्रमदान केले.
दरवर्षी पाणी टंचाई ही समस्या बनत असताना अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्या वतीने पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता गोळप येथे लोक सहभागातून तात्पुरत्या स्वरूपात कच्चे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख अविनाश काळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पाण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मोठ्याप्रमाणात कोकणात पाऊस पडूनही भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. ही समस्या दूर करायची असेल तर शासनाची भूमिका व लोकसहभाग महत्वाचा आहे. आज लोकांमध्ये जागृती होत असून भविष्यात पाणी मुरवण्यासाठी चळवळ बनणं आवश्यक आहे.
तालुका कृषी अधिकारी श्री. भोये यांनी भेट देऊन बंधारे उपक्रमाबद्दल कौतुक केले. कृषी अधिकारी माधव बापट, कृषी सहाय्यक धनाजी पोळ यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड, सचिव समित घुडे, सहसचिव प्रकाश संते, अविनाश दिवेकर, महेश पालकर, अद्वैत काळे, हितेन पालकर, सुभाष देवरूखकर, संतोष देवरूखकर, विवेक देवरूखकर, निखिलेश देवरूखकर, हरिश्चंद्र गोरीवले, विलास गोरीवले, संदेश गोरीवले, दीपिका देवरुखकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.