‘महामार्गानजीकची झाडी छाटा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महामार्गानजीकची झाडी छाटा’
‘महामार्गानजीकची झाडी छाटा’

‘महामार्गानजीकची झाडी छाटा’

sakal_logo
By

63533
सावंतवाडी ः महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना मनसे पदाधिकारी.

‘महामार्गानजीकची झाडी छाटा’
सावंतवाडी ः मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-नेमळे येथे सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. वारंवार निवेदने तसेच लक्ष वेधूनही याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघात होत असून याबाबत तत्काळ योग्य ती भूमिका घ्यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. महामार्गावर उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी महामार्गाचे अधिकारी खट्टी यांची नुकतीच भेट घेतली. याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राकेश परब, साहिल तळकटकर, शतायू जाभळे, केतन सावंत, आदित्य राऊळ, प्रथमेश राणे, महेंद्र कावळी, जय सकळ आदी उपस्थित होते.
--
सावंतवाडीत आज ‘महारक्तदान’
सावंतवाडी ः येथील सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटना, राजा छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. २१) महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शहरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संघटना, संस्था, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी व रोटरी क्लब सहभागी होणार आहेत. सकाळी नऊला रक्तदात्यांसाठी नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था सावंतवाडी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यावतीने केली आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानपत्र व डोनेट कार्ड देण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ''सामाजिक बांधिलकी''च्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी देव्या सूर्याजी, रवी जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
---
हरवलेला मोबाईल सापडला
कणकवली ः शहरात चार दिवसांपूर्वी हरवलेला ओंकार परब (रा. कुवळे-परबवाडी) या युवकाचा मोबाईल कलमठ येथील अक्षय जाधव या युवकास सापडला. अक्षय याने येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात कार्यरत असलेले वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांच्याकडे मोबाईल दिला. त्यानंतर गुरुवारी कणकवली पोलिस ठाण्यात आलेल्या ओंकारकडे मोबाईल सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी विनोद चव्हाण यांच्यासह हवालदार विनोद सुपल उपस्थित होते.