न्यू दाभोळ स्पोर्टस ग्रुपचा एन. डी. एस. महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू दाभोळ स्पोर्टस ग्रुपचा एन. डी. एस. महोत्सव उत्साहात
न्यू दाभोळ स्पोर्टस ग्रुपचा एन. डी. एस. महोत्सव उत्साहात

न्यू दाभोळ स्पोर्टस ग्रुपचा एन. डी. एस. महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

न्यू दाभोळ स्पोर्टस ग्रुपचा
एन. डी. एस. महोत्सव उत्साहात
दाभोळः येथील न्यू दाभोळ स्पोर्टस् ग्रुपचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एन. डी. एस. महोत्सवाचे उत्साहात झाला. त्याचे उद्घाटन नरेश नरवणकर यांच्या हस्ते झाले. महोत्सवात रंगावली प्रदर्शन व स्पर्धेत (विषय- पर्यावरण रक्षण) भक्ती कर्देकर यांनी प्रथम, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुलींनी (विषय- चंडिका देवी) द्वितीय आणि तृतीय क्रमांक (मोबाइलचा अतिरेक वापर टाळा) तृप्ती गुजर यांनी पटकावला. पाककृती स्पर्धेत शमिका मांडवकर (करंदीची खीर), तृप्ती गुजर (पालक फ्रान्की), मनीषा गोयथळे (मुठीया) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. निबंध लेखन स्पर्धेत (विषय- मी दाभोळ बोलतोय) श्रुतिका नवजेकर, मेहक खान यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला. रस्सीखेच स्पर्धेत नवदुर्गा महिला मंडळ, दत्तकृपा महिला मंडळ, गुरुकृपा महिला मंडळाने क्रमांक मिळवले. दाभोळ गावात प्रथमच खालूबाजा तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अबुभाई खालूबाजा तुफान ग्रुप, धामणस्कर बाबा खालूबाजा, साखरोली नं. २ यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना रोख रक्कम, सन्मानपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धेमधील सहभागी खालुबाजातील स्पर्धक, सर्व सनई वादकांना सन्मानित करण्यात आले.
-------------
महिलांना शिलाई मशिन वाटप
दाभोळ ः दापोली तालुक्यातील वाकवली येथील माहेरवाशीण, महाराष्ट्र कामगार क्रांती सेनेच्या रत्नागिरी जिल्हा संघटक दिक्षा माने यांच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील नाभिक समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. याचा लाभ गरजू ३० महिलांना देण्यात आला आहे. शिलाई मशिन वाटप हा कार्यक्रम उन्हवरे वाकवली गटाचे अध्यक्ष संदीप चव्हाण व बंटी चव्हाण यांच्या प्रयत्नाने वाकवली येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, महाराष्ट्र कामगार क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष बबन मोहिते, प्रदेश महिला अध्यक्षा सौ. पल्लवी पाटील, राष्ट्रीय युवा अध्यक्ष संदीप डोंगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उषा पवार, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा सामायरा उर्फ गीता संतोष भारती, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्षा सुजाता माने, माजी उपसभापती ममता शिंदे आदी उपस्थित होते.