लांजा-साटवलीच्या सरपचंपदी इरम बरमारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-साटवलीच्या सरपचंपदी इरम बरमारे
लांजा-साटवलीच्या सरपचंपदी इरम बरमारे

लांजा-साटवलीच्या सरपचंपदी इरम बरमारे

sakal_logo
By

rat२०p१८.jpg
६३६४४
लांजाः साटवलीच्या नव्या सरपंच, उपसरपंचांसोबत पदाधिकारी.
----------------
साटवलीच्या सरपचंपदी इरम बरमारे
ठाकरे गटाचे वर्चस्व ; उपसरपंचपदी लांबे
लांजा, ता. २०ः तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक झाली. सरपंचपदी इरम इर्षादअली बरमारे, तर उपसरपंचपदी जबीन लांबे यांची निवड करण्यात आली.
साटवली ग्रामपंचायतीवर २२ वर्षे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे वर्चस्व आहे. शनिवारी (ता. १९) सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद सदस्य पूजा आंबोळकर, माजी पंचायत समिती सदस्य आदेश आंबोळकर, माजी उपसरपंच महेश नारकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. यासाठी माजी सरपंच दत्ताराम सावंत, नदीम बरमारे, शाखाप्रमुख बाणे, प्रशांत भालेकर, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. या निवडीनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार कांबळे यांनी काम पाहिले.